पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ शेक् स्पियरकृत - नाथ्यमाली अर्थात्, रूद्राक्ष हाणजे कॉटनग्रेप (Cotton grape) असा शब्द सिद्ध झाला ! एका भाषेतील शब्द दुसन्या भाषेत नेण्याची ही खाशी युक्ति ! ' खरोखर नीन नवीन शब्द मराठीत सिद्ध करण्याची ही युक्ति जशी मासलेवाईक आहे, तशीच ती अगदीं अपूर्व आहे! अशा रीतीनें शब्दांचे व वाक्यांचे भाग पाडून भाषांतरें होऊं लागलीं ह्मणजे मराठी भाषेत भराभर भाषांतरें करितां येऊ लागतील ! व मराठींत वाटेल त्या विषयावर ग्रंथ बनवितां येऊ लागतील ! केवढा या युक्तीचा प्रभाव ! जे कोणी मनःपूर्वक ह्या युक्ती- चा आदर करतील त्यांच्या हातून मराठी मापेचें एक मोठेच कार्य झालें असें होईल व त्याबद्दल मराठी भाषा बोलणारे सर्व लोक त्यांचे फार फार आभार मानतील यांत शंका नाहीं. परंतु शब्द बनविण्याची ही युक्ति कोणी विचा मराठींत चालविल तर चालवो ! परंतु हीच युक्ति मराठी शब्दांचे भाषांतर इंग्रजींत करताना कोणी चालवील तर ती इंग्रजी ग्रंथकारास कितपत पसंत होईल याची बरीक शंका आहे. बहुधा ती त्यास बिलकूल पसंत पडणार नाहीं. इतकेंच नव्हे तर अशा युक्तिवाजास ते मूर्खातच काढतील, हें आझी खात्रीने सांगतों. तथापि इंग्रजी शब्दांना मराठींत वाटतील तसे शब्द ठोकून देण्याचा क्रम ज्यांनीं धरिला आहे, अशा मराठीची सेवा करावयास निघालेल्या आस्थे - वाईक मंडळीनी मात्र ह्या युक्तीचा अवश्य आदर करण्या- सारखा आहे, असें आमचें मत आहे. आतां मराठी भाषेच्या सध्याच्या स्थितीकडे पाहिले असतां इंग्रजी शब्दांचें व वाक्यांचें भाषांतर करण्याची तर पाळी हरहमेश येते, आणि नवे नवे शब्द योजावे लागतात.