पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. २७ तेव्हां हैं भाषांतर कसें करावें, नवे नवे शब्द कसे निर्माण करावे हे प्रश्न उत्पन्न होतात. वस्तुतः हे प्रश्न जसे अत्यंत महत्वाचे आहेत तसेच ते फार विचाराचे आहेत असें आह्मांस वाटतें. एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेतील शब्दांशी अर्थाने तंतोतंत नेहमीं जुळतीलच असें बहुधा होणे कठीण! तशांत इंग्रजी भाषा चांगली परिपक्क दशेस येऊन पोहचली असून तिच्यात असे कित्येक शब्द आहेत कीं, त्यांस मराठीत शब्दच नाहींत. तेव्हां त्यांचें भाषांतर करण्यास फार जड जाते. व त्यांच्या ठिकाणी नवे नवे शब्द योजणें भाग पडते. पण असे नवे नवे शब्द आणावे कोठून ? ही नेहमीं अडचण पडत असल्याकारणानें शब्दास शब्द ठेऊन देऊन भाषांतरे दडपून देण्याची कित्येकांची वहिवाट आहे. त्यांचे म्हणणें असें पड़तें कीं, इंग्रजीतून मराठींत भाषांतर करताना शब्दाच्या ठाकटेकीकडे किंबहुना शुद्धते- कडे देखील एवढे लक्ष देण्याची कांहीं गरज नाहीं. पाव- लो पावलीं शब्दांची निवड करूं म्हटलें तर कसे चालेल १ आपला अभिप्रेत अर्थ कसा तरी व्यक्त करता आला म्ह- णजे पुरे. " अर्थरितात्पर्य, न तु शब्दरि" हे प्राचीन सुभा- षित प्रसिद्धच आहे. त्यावर नजर देऊन ते आपला कार्यभाग उरकून घेतात. पण हा दडपशाहीचा मार्ग कोणाला पसंत असेल तो असो. आम्हास तर तो अगदीं अयोग्य वाटतो. राज्यकारणी प्रकरणांत दडपशाहीचे तत्व अंगिकारल्या वांचून चालत नसेल हें खरें; पण सरस्वतीच्या राज्यांत तरी या तत्वाचें अवलंबन करण्याचें कांहींच प्रयोजन नाहीं, अशी आमची समजूत आहे. कारण इंग्रजी शब्दांचें भाषां- तर करतांना ही जी मोठी अडचण येऊन पडते तींतून