पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. २५ एकास सुख तर दुसन्यास सुख असे अर्थ असूनही आ- णखी दुसन्याविषयीं अनुकूलता, कळकळ, दयाबुद्धि, ममत्व, ममता वाटणे वगैरे अनेक अर्थ ग्रथित आहेत. तेव्हां एवढ्या सर्व अर्थाचा मराठीतील एकाच शब्दानें बोध करितां येणे कठीणच. यासाठी प्रसंगानुरोधानें वेगवे- गळे मराठी शब्द योजणें हेंच प्रशस्त आहे असें आमचे मत झाले आहे. 'सिम्पथी' ( Sympathy) शब्दाला मराठीत चांगलासा शब्द नाहीं, ही गोष्ट खरी आहे. तसाच तो असावा हि इष्ट आहे. तथापि ह्यासाठीं दे रांगडे शब्द उपयोगांत आणणे कितपत योग्य आहे, याचा विचार मराठी भाषेच्या आस्थेवाइकांनी करावा, ह्या हून आमच्याने येथे अधीक कांहींच दाणवत नाहीं. मराठीत इंग्रजीवरून शब्द आणतांना शब्दास शब्द ठेवून देऊन कर्धी चालणार नाहीं, हें जसें खरें आहे तसेंच शब्दाचे भाग पाडून भाषांतर करण्याची रीतही अप्रयोजक आहे, हेंहि लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तसें केलें असतां विलक्षण प्रकार कसा होतो, ह्याचें एक मौजेचे उदाहरण आमच्या पाहण्यांत आले आहे तें येथें लिहिण्यासारखें आहे. कोणा एका परीक्षा पास झालेल्या गृहस्थाची व एका गांवगुंडाची एकदां गांठ पडली. तेव्हां गांवगुंडाने त्यास फजीत करण्याच्या बुद्धीनें हाटलें 'कायहो ! तुह्मांस इंग्रजी चांगले येते तर आम्हास 'रूद्राक्ष ' याला इंग्रजी शब्द काय हें सांगाल काय ? ' सदर गृहस्थानें तत्काळ आपलें अज्ञान कबूल केलें. तेव्हां गांवगुंड हाणाला, ' बस! तुझांला नाही येत तर मी सांगतों. अहो रूहणजे $ काटन ' (Cotton) आणि द्राक्ष हाणजे 'ग्रेप' (Grape)