पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ शेकूस्पियरकृत - नाट्य माला. आतां दुसरा एक शब्द सांगतों. तो सिद्ध करतांना शब्दाचे भाग पाडण्याची रीत अंगीकारण्यांत आली आहे ती कशी चमत्कारिक आहे हें पहाण्यासारखे आहे. ..' सि- म्पथी' ( Sympathy ) हा इंग्रजी शब्द आहे. ह्या- ला प्रतिशब्द म्हणून सहानुभूति हा मराठीत बोलण्यांत व लिहिण्यांत येऊ लागला आहे. पण सिम्पथी (Sympathy) याच्या अर्थाचा यथार्थ बोध 'सहानुभूति' या शब्दावरून होतो काय ? असें आह्मी विचारतो. आमच्या मतानें तर बिलकूल होत नाहीं. मग हा सहानुभूति शब्द आला कोठून ? व सिद्ध झाला कसा हें जर पाहिले तर मोठा चमत्कर वाटतो. खरोखर ज्याच्या डोक्यातून प्रथम हा शब्द निघाला असेल, त्याचे डोके मोठें विलक्षण छाटलें पाहिजे. सहानुभूति ह्याची उपपत्ती पहावयाची असली तर ' सिम्पथी ' ( Sympthty ) श- व्दाच्या उपपत्तीपर्यंत मजल मारली पाहिजे. 'सिम्पथी (Sympathy ) शब्दाची उपपत्ति अशी आहे. Syn to- gether अथवा with ह्मणजे सह, सहित आणि Pathos feeling ह्मणजे अनुभव, आणि अनुभव हाणजे अनुभूति; अशा परंपरेनें ' सिम्पथी ' ( Sympathy ) ह्मणजे सहानु- भूती ' असा शब्द सिद्ध झाला. कोण हा द्राविडी प्राणायाम ! आणि येवढा हा द्राविडी प्राणायाम करूनही, ह्या शब्दाचे ठि- काणीं शब्दसौष्ठव नाहीं तें नाहींच व त्यापासून इष्टार्थाचा व्हावा तसा बोधही होत नाहीं तो नाहीं. सिम्पथी ह्या शब्दाच्या अर्थाचा बोध " " समदुःख सुखत्व ह्या शब्दानें कांहीं होतो, पण हाही शब्दसमुच्चय तोकडाच पडतो यांत शंका नाहीं. सिम्पथी शब्दांत, एकास दु:ख तर दुसन्यास दु:ख,