पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी प्रस्तावनां. २३ हे शब्दप्रयोग कानाला गोड लागत नाहीत. इतकेंच केवळ नाहीं तर त्यांत अरसिकपणाचीही झाक दिसून येते असें म्हणावयास चिंता नाही. अशा ओंगळ शब्द प्रयोगाच्या ऐव- जीं 'स्वदेश' ' जन्मभूमि' हे शब्द उत्कृष्ट असून चांगले शुद्ध आहेत. आणि मातृविषयक प्रेमाचा पान्हाच फोडाव- याचा असेल तर ‘भूमाता' व ऋचित् 'देशजननी हे शब्द- ही प्रशस्थ आहेत. ते योजण्यांत येतील तर किती बरें होईल. C परंतु मराठी भाषेकडे पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे आणि इंग्रजी भाषेच्या अत्यंत परिचयामुळे, केव्हां केव्हां तर मराठी योग्य शब्द न सुचतां त्या अर्थाच्या इंग्रजी शब्दाचें निव्वळ भाषांतर होऊन बोलण्यांत व लिहि- ण्यांत येते तेव्हां जी मजा उडते ती कांहीं पुसूं नये. असें एक उदाहरण नुकतेंच आम्हास ऐकावयास मिळालें तें येथे सांगण्यासारखे आहे. कोणी गृहस्थ म्हणाले- अहो, तेवढे ते 'घड्याळाचे' हात सारून घड्याळ लावाल काय ?" यावर दुसरे । गृहस्थानें उत्तर केले "घडयाळ लावतों, पण तुमच्या घडया- ळाला हात कधी फुटले ? " हे शब्द ऐकतांच पहिले गृहस्थ एकदम शुद्धीवर आले व त्यांस आपली चूक तत्काळ कळून आली; तशीच ती आमच्या वाचकांसदी कळून आल्यावांचून रहाणार नाही. इंग्रजीत ( The hands of a clock ) असें हाणतात. पण मराठीत वडयाळाचे हात असें न ह्मणतां कांटे ह्मणण्याची वहिवाट आहे, हे कोणासही सांगावयास पाहिजे असे नाहीं. अशाच प्रकारची मौज मराठींत प्रसिद्ध झालेल्या कित्येक ग्रंथांतून व मासिक पुस्तकांतील लेखांतून आढळून येऊं लागली आहे. तेव्हां मराठी भाषेच्या आस्थेवाइकांचे लक्ष तिकडे जाणे जरूर आहे.