पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. 9 समासांत उत्तर पद प्रधान असतें; व माता हैं प्रधान पद आहे. व तेंच येथे इष्ट आहे. कारण भाषेला मातेची उपमा देण्यांत मातेविषयी आपले मनांत जें प्रेम व जो बहुमान बसत असतो तोच भाषेविषयीं दर्शवावा असा आपला हेतु असतो. तो अन्यरीतीनें समास करून सिद्धीस जावातसा जाण्यासारखा नाहीं. सारांश मातृभाषा हा शब्द- प्रयोग कोणत्याही दृष्टीने पाहिली तरी अग्रुद्ध असून अप्रयो- जक होय, असे आम्हांस वाटतें, खरें म्हटले तर 'मदरटंग' ( Mother tongue ) याचे ऐवर्जी ' स्वभाषा' 'जन्म भाषा ' हे उत्कृष्ट शब्द रूढ आहेत, आणि मातृविषयक प्रेमच व्यक्त करावयाचे असले तर ' भाषामाता' ' भाषा- जननी ' हे शुद्ध शब्दही योजण्यास नड नाहीं. पण मराठी भाषेचा व्यासंग नसल्यामुळे या योग्य शब्दाची आठ- वणही कोणास होत नाहीं, व अनुकरणेच्छेने त्यांचें मन अपप्र- योगाकडे धावतें ही केवढया खेदाची गोष्ट आहे ! मातृभाषा मायभाषा ' याच शब्दाच्या नमुन्यावर मातृदेश' व मायदेश' हे शब्दही अलीकडे चांगल्या चांगल्या लेखांतून घुसूं लागले आहेत; तेव्हां त्यांचाही उल्लेख येथें करणें जरूर आहे. हे शब्द 'मदरकन्ट्री' ( Mother country) यांचे पर्याय होत हैं सांगणें नलगे. वरील शब्दांचें ठिकाण जे दोष आहेत ते तर ह्यांत आहे- तच ! पण आणखी या शब्दांत माधुर्यही नाहीं, ही गोष्ट विशेष आहे. एके दृष्टीनें पाहिले तर ' मातृभाषा ' ह्यांतील दोन्ही पदें स्त्रीवाचक असल्यामुळे हा शब्दप्रयोग येवढा कानाला वाईट लागत नाहीं. पण 'मातृदेश' 'माय देश' ह्यांतलें एक पद स्त्रीवाचक व दुसरे पुरुषवाचक असल्यामुळें