पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्होनेसनगरचा व्यापारी प्रस्तावना. 9 याचें नेहमींचें उदाहरण हाटलें हाणजे ' अवापति " ( आईचा नवरा ) हे होय. याच दोपांस ' मातृभाषा हा शब्दप्रयोग पात्र झाला आहे हें कोणाचेही सहज लक्षांत येईल. भाषेस मातेसमान लेखणे ही कल्पना अगर्दी योग्य आहे. वर रा० मोगरे यांच्या कवितेत हीच कल्पना आणली आहे. आणि तेथे ती किती शोमते हें कोणासही रुहेज कळण्यासारखे आहे. परंतु भाषा ही मातेसमान आहे असा अर्थ दाखविण्याकरितां · भाषामाता असा शब्दप्रयोग करावयास पाहिजे होता. तो तसा न केल्यामुळे वर ८ ८ दर्शविल्याप्रमाणे घोंटाळा झाला आहे. मग 'मा, भाषा' हा अशुद्ध व असंभाव्य अपप्रयोग आला कोठून ? जर पाहिले तर मदरटंग' (Mother tongue ) याचें शब्दास शब्द ठेऊन देऊन केलेले हैं निवळ भाषांतर होय. हे दोन्ही भाषांतील पदांकडे पाहिले असतां सदज कळण्यासारख आहे. यावर आमचें असें ह्मणणे आहे कीं हें भाषांतर मराठी भाषेच्या शब्दप्रयागास बिलकूल धरून नाहीं. इंग्रजी मध्ये 'लेडीमॅकबेथ् ' ( Lady Macbeth ) ' फादर लारेन्स ’( Father Lawrence ) 'मदर शिजेल (Mat- her schegal) असे म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु मराठी- तला प्रचार यांच्या उलट आहे. आपली रीत म्हटली म्हणजे ' कालीमाता ' ' मरी आई' ' मॅकबेथ बाई ' लॉरेन्स बाबा' असे म्हणण्याची आहे. या रितीस अनुसरून म्हटलें म्हणजे ' मदर टंग ' ( Mother tongue ) याचें भाषां तर ' भाषामाता ' असेंच झाले पाहिजे हे उघड आहे, असा करतां C " मातृभाषा ' याचा अर्थ मातृरूपभाषा' येणार नाही. कारण हा कर्मवारय समास होय. कर्मधारय 6