पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. भाषा अशा दोन वेगवेगळ्या भाषा विवक्षित आहेत असें ध्वनित होतें. पाश्चिमात्य देशांत आई इंग्रज तर तिचा पती फ्रेंचमन ही गोष्ट संभवनीय असल्यामुळे, आई, बाप, व लेक यांच्या वेगवेगळ्या भाषा असणे संभवनीय आहे. व्हेनीस नगरचा व्यापारी ह्या नाटकांतच पाहिले तरी पोर्शियेच्या स्वयंवराला वेगवेगळ्या देशचे राजपुत्र येतात; त्यांच्या पोर्शियेच्या भाषेहून वेगळया आहेत. असे आपण पहातों. इंग्रजी गृहस्थार्थी जेव्हां तिची गांठ पडते तेव्हां त्यास इ. टॅलियन भाषा व पोर्शियेस इंग्रजी येत नसल्यामुळे दोघां- वरही मूकस्तंभ होऊन राहण्याची पाळी आली तेणेंकरून कशी मौज उडाली ती कवीनें स्वतः पोर्रीियेच्याच तोंडून वदावली आहे. * स्वतःची भाषा एक व आईची किंवा बा- पाची भाषा वेगळी अशी तन्हा हिंदुस्थानांत तरी फारशी संभवनीय नाहीं. यास्तव मातृभाषा म्हणजे मातेची भाषा असा असंभाव्य शब्दप्रयोग करणे बरोबर नाहीं. संस्कृत अलंकार शास्त्रज्ञांनी अशा प्रकारच्या शब्दयोजनेस दोषांत काढिले अ- सून, 'विरुद्धार्थमतिकृतदोप' असें नांव त्यास दिले आहे.

  • “ व्हेनिस नगरचा व्यापारी " अंक १ प्रवेश २ पृष्ठ १९ पहा.

+ प्रसिद्ध अलंकारशास्त्रज्ञ मम्मटभट यानें 'भवानीपति हा शब्दप्रयोग देखील सदोष असल्यावरून त्याज्य लेखिला आहे भव ह्मणजे शंकर, त्याची स्त्री ती भवानी, तिचा पति तो भवानी पति हा शब्दप्रयोग भवभूति कृतमहावीरचरितांतील पुढील लोकांत आला आहे. न त्रस्तं यदिनाम भूतकरुणासंतान शांतात्मन: तेनव्यारु जता- धनुर्भगवतो देवाद्भवानीपतेः । हा लोक उतरून घेऊन तो ह्मणतो-' इत्यत्रभवान्याः पत्यंतरं- सूचीतम् ' काव्यप्रकाश, उल्लास ७