पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी प्रस्तावना. योजना, इत्यादि भाषादूषणांची रेलचेल झाल्यामुळे ती बिघ... डून जाऊन बुडण्याच्या पंथास लागल्याची शंका येऊं लागली आहे; हें एक भाषेच्या संबंधानें झाले. आतां अशा या ग्रंथाकडे पाहिले असतां वरील हेळसांडीचे प्रायश्चित्त त्याच्या कर्त्यासही मिळाल्याबांचून रहात नाहीं. कारण, पहा कीं, ह्या भाषादूपणांच्या योगानें बहुधा ग्रंथाबरोबर त्यांच्या कर्त्यांचेही हांसे होण्यास कारण हो तें. विषयासंबंधानें पुष्कळ लिहिण्यासारखे आहे; पण तसे करण्यास येथें सवड नाहीं. तथापि इंग्रजी भाषेच्या अनुकरणानें अशुद्ध शब्द व शब्दांचे अपप्रयोग यांचें सध्यां मराठी भाषेंत कसें बंड माजलें आहे, हें दाखवावें असें मनांतून आहे. ह्यासाठी कांही शब्द मात्र येथे देतों; व त्यांच्या योजनेंमुळे अ र्थाचा अनर्थ होऊन कशी मौज होते हैं दाखवितो. प्रथमारंभी आह्मी मातृभाषा ' हाच शब्द घेतों. अलीकडे कोणीही मराठीत लिहूं लागला हाणजे बहुदा प्रस्तावनेंत स्वभाषेचा मोठा कळवळा दाखवून हाणतो कीं, ' मातृभाषे ' ची सेवा करण्याची आमची इच्छा आहे. आणि हा मातृभाषा शब्दही जड, अवघडसा त्याच्या बुद्धीला वाटला व अगदर्दी साध्या व सोप्या भाषेनें बोलावेंसें त्याच्या मनांतून आले तर त्या ऐवज 'मायभाषा' हा शब्द देखील योजण्यास तो चुकत नाहीं. आतां ह्या लिहिणाराच्या मनांत क्वचितच येत असेल की, आपल्या लिहिण्याचा विप रीत अर्थ होऊन, अनर्थास कारण होईल. पहा कीं, 'मातृ- भाषा ' याचा अर्थ ' मातेची भाषा ' असा होतो. हा अर्थ त्यास इष्ठ आहे काय ? मातेची भाषा असें ह्मटलें असतां लिहिणाराची भाषा वेगळी व त्याच्या मातेची भाषा वेगळी & "