पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. पर्येत सरासरी मराठीचे जे काय शिक्षण मिळतें तें मिळतें. पुढें इंग्रजी भाषेचा अभ्यास होऊन इंग्रजी विद्यापीठाच्या तीन चार परिक्षा पास होईतोपर्यंत मजल येते; एवढ्या अवकाशांत प्रौढदशा प्राप्त होते; व बुद्धीलाही बराच संस्कार होतो. त्यामुळे स्वभाषेत कांहीं करावें अशी इच्छा होऊन लिहिण्याकडे प्रवृत्ती होते इतकेंच ! परंतु मराठी भाषेचा आस्थापूर्वक अभ्यास व्हावा, व तिचा व्यासंग व्हावा तो मात्र होत नाही. हें व्यंग लक्षांत आणून विद्यापीठाच्या शेव- टच्या परिक्षेला मराठी भाषा हा एक विषय ठेवला आहे. व खालच्या कांहीं परिक्षांसही, तो ठेवावा म्हणून खटपट चालू आहे. बडोदें येथील संमेलनाचें वेळीही याच आश याचा एक ठराव झाला आहे. हे सर्व टीक आहे. परंतु या प्रमाण तजवीज झाली असतांही वरील आमच्या लिहिण्याला कांही बाव येईल असें आह्मांस वाटत नाहीं. परिक्षांकरितां केलेला अभ्यास किती तुटपुंजीचा असतो हे कोणास सांगावयास पाहिजे असें नाहीं. आमचा लिहिण्याचा भावार्थ हा आहे, कीं ग्रंथकर्तृत्वाला कांहीं विशेष अभ्यास पाहिजे, ह्या मुद्यासंबंधानें कोणाचें वेगळें मत होईल असे वाटत नाहीं. आतां मराठी भाषेच्या अभ्यासाची व तिच्या व्यासंगाची ही जी हेळसांड होत आहे, तिचे परिणाम काय झाले आहेत व होत आहेत त्यांकडे अंमळ लक्ष देण्यासारखे आहे. एकंदरीनें पहातां, ते मराठी भाषेला अनर्थावद्द आणि तिच्या अभिवृद्धीला अपायकारक असेच आहेत, यांत संशय नाहीं. मराठी भाषेचा अभ्यास होत नसल्यामुळे, भाषेत अशुद्ध भाषापद्धत, शब्दांचे अपप्रयोग घोंटाळयाची वाक्य-