पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्होनसनगरचा व्यापारी प्रस्तावना. १७ गोष्ट किती अगत्याची आहे हें कोणासही सांगणे नलगे. पण इकडे कोणाचें तरी लक्ष गेलें आहे काय ? खरोखर ही स्थिति पाहून फार वाईट वाटतें. सर्वोचा कटाक्ष पदावा तो मराठी भाषेत पुष्कळसे ग्रंथ व्हावेत, व ते नानाप्रकारच्या विषयांवर व्हावेत एवढाच दिसतो. परंतु हे ग्रंथ शुद्ध सरळ भाषेत लिहिलेले असावेत. तसेच ते सुबोध असावेत, झणजे सामान्य मराठी वाचकांसद्दी समजैसे असावेत, ही गोष्ट अग त्याची नाहीं काय ? ग्रंथलेखनाचा उद्देश पाहिला तर ते लोकांच्या वाचण्यांत येऊन त्यांस ज्ञानलाभ व्हावा हा dh आहे. पण ग्रंथ दुर्बोध झाले असतां, ते वाचण्यांत यावे कसे ? हा विचार मराठींत ग्रंथ लिहिणारांच्या मनास सध्या शिवत असेलसें दिसत नाही. आम्हास तर असे वाटतें कीं जोपर्यंत मराठी भाषेचा अभ्यास व तिचा व्यासंग करून शुद्ध सरळ मराठी भाषेंत ग्रंथ लिहिण्याकडे ते लिहिणारांची प्रवृत्ति झाली नाही, तोपर्यंत तिची वाढ होण्याची आशा व्यर्थ आहे. मराठी भाषेच्या अभ्यासाच्या अवश्यकतेविषयीं वर जें म्हटले आहे, त्यांत मराठी भाषेच्या अभ्यासाची सध्यां हेळ- सांड होत आहे ही गोष्ट गृहित धरलेली आहे. खरे म्हटलें असतां ही गोष्ट एवढी उघड आहे कीं, तिच्या सत्यतेविषय विस्तारानें लिहिण्याची कांही जरूर नाहीं. मराठी भाषेत सामान्यतः अलीकडे जे ग्रंथ होतात तें पाहिले असतां, ह्या गोष्टीचे प्रत्यंतर सहज मिळण्यासारखे आहे. मराठी भाषेच्या अभ्यासाची हेळसांड होत आहे, हा बोभाटा कांहीं नवीन नाहीं. हा सध्यांच्या शिक्षणक्रमांतलाच दोष आहे. सथ्यां- चा क्रम असा आहे की, कोणालाही तीन चार इयत्ते- ३