पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेक्स्पियरकृत-नाट्यमाला उद्देशून एका आधुनिक कवीनें जे उद्गार प्रगट केले आहेत, ते जसें समर्पक तसेंच अत्यंत हृदयंगम आहेत. त्यांचा • सर्वांनी अवश्य विचार करावा. तो म्हणतो:- म्हणतात जे-'मराठी भाषा होणार ही असे नष्ट । मिळणार काय करुनी व्यर्थ हिला वांचवावया कटं ? -' ॥ त्यांना हेंच पुसा की 'मरणोन्मुख होय आपुली माय । औषध म्हणने पुत्रीं कांहीं देऊं नये तिला काय ? ॥ माता तशी स्वभाषा सेवाया योग्य आपणा उचित । किबहुना, मातेहुनि अधिक हिची योग्यता अर्से खचित ॥ मोगरे कवि. स्वभाषेची ही योग्यता लक्षांत घेऊनच, मराठीच्या पुरस्कत्यां गृहस्थांनीं तिच्या अभिवृद्धीचा विचार चालविला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे कांहीं वर्षे मराठी भाषेच्या आस्थेवाईकांचे व ग्रंथकारांचें संमेलन भरूं लागले आहे, हे सर्वांस ठाऊकच आहे. आणि ह्या वर्षी श्रीमंत सयाजी- राव गायकवाड यांनी बरीच मोठी रक्कम देऊं केल्यामुळे, चालूं सालचें संमेलन, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद ' हैं प्रौढ • नांव धारण करून नुकतेंच बडोदें येथे भरविण्याचा मोठा समारंभ झाला, हेंदि वर्तमानपत्रांवरून महशूर आहे. ह्या • प्रसंग, मराठी भाषेची अभिवृद्धी कशी होईल ह्याविषयों पुष्कळसा ऊहापोह झाला; वक्त्यांची भाषणे झाली आणि पंडितांचें निबंध परिषदेपुढे आले, तथापि त्यांत एका महत्वाच्या गोष्टीकडे आस्थेवाईक मंडळीचें लक्ष गेलें आहेसें दिसत नाहीं. ती गोष्ट ही कीं, ग्रंथ लिहू इच्छिणारांनी अगोदर मराठी भाषेचा अभ्यास केला पाहिजे, व तिचा व्यासंग ठेवला पाहिजे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीला ही