पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी प्रस्तावना. व याबद्दल अभिज्ञ गृहस्थांचीं अनुकूल मतें पत्रद्वारें आझां- कंडे आली आहेत. #डेक्कन व्हरनॅक्युलर सोसायटी या नांवा- च्या मंडळींनी पहिला व दुसरा खंड पसंत केला असून, कर्त्यास बक्षीस दिले आहे, हीही संतोषाची गोष्ट येथें कळ- विण्यासारखी आहे. नजर येईलच. आमची पुस्तकें गेली ह्या तिसऱ्या खंडांत कोणती नवी तन्हा अमलांत आणली आहे, हें यांतील चित्रांकडे असतां वाचकांच्या सहज लक्षांत होईल तोंवर माहितीनें पूर्ण व दिसण्यांत सुबक करून, चिर- कालिक उपयोगाचीं व संग्राह्य करण्याविषयीं आमची किती उत्कंठा आहे, हे यावरून लक्षांत येईलच. सांप्रत मराठी भाषेच्या अभिवृद्धीकडे बरेंच लोकांचे लक्ष लागले आहे; आणि आमचा उद्योगही मराठी भाषेच्या सेवेचाच आहे; तेव्हां ह्या संबंधानें चार शब्द येथे लिहिले असतां ते अप्रासंगिक होतील असें वाटत नाहीं. मराठी ही आपली जन्मभाषा आहे, आणि जन्मभाषेची सेवा करणे व तिच्या अभिवृद्धीविषयीं झटणें हें आपलें कर्तव्य आहे. कदाचित्, ह्याहून अधिक श्रेष्ठ व पवित्र कृत्य दुसरे कोणतेंहि नसेल. जन्मभाषेला मातेची उपमा दिली आहे; व ती अगदर्दी यथार्थ आहे. कारण, तशीच तिची योग्यता आहे. इंग्रजी भाषेच्या प्रचारामुळे मराठी भाषे- विषय ज्यांच्या मनांत अनास्था उत्पन्न झाली आहे, अशांस

  • हीं सर्वमतें सर्वांस कळण्यासाठी आह्मीं प्रसंगानुरोधानें प्रसिद्ध

करणार आहों. कै. शंकर मोरो रानडे यांचे मत, इंदुप्रकाश, काळ, नेटिव ओपीनियन वगैरे वर्तमानपत्रकत्यांची मतें फारच उत्तम पडलीं आहेत, तीं यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. - प्रथम खंड, तुफान प्रस्तावना पहा पृष्ठे ४४-४५.