पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ शेकूस्पियरक्त-नाट्यमाला. मराठी भाषा ही आमची एकट्याची आहे, असे नाहीं; तर आपणां सर्वोचीच आहे व यासाठी या काम सर्वांनीच मदत करणें अवश्य आहे. ही मदत मिळाली असल्यामुळे, आर्शी पुढील खंड लवलर लवकर काढण्यास समर्थ होऊं, अशी आझांस मोठी उमेद आहे. आपली जन्मभाषा जी मराठी तिची सेवा आपल्या हातून व्हावी अशा बुद्धीनें, आझीं हा उद्योग मुख्यत्वेंकरून हात घेतला आहे. त्यायोगानें शेकस्पियर कवीसारख्या एका सर्वमान्य कवीच्या सर्व ग्रंथांचा लाभ मराठी भाषेस होईल, व शेक्- स्पियर हैं काय प्रकरण आहे, हे वाचकांस मराठीत कळ- ण्यास मार्ग होईल, असे आह्मांस वाटते. प्रस्तुतसारख्या पुस्तकांत भाषासरणी ही एक मुख्य गोष्ट आहे, तसेंच शेकू- स्पियरची नाटके वाचावयाची ती केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनें वाचणें बरोबर नाहीं.-- नाटकेच आहेत, त्यापक्षी मनोरंजन त्यांजपासून होईल हे खरें; तथापि त्याहून कांहीं अधिक लाभ व्हावा, अशी आपली अपेक्षा असावी हे योग्य आहे. आमच्या पुस्तकांत विशेषतः ह्या गोष्टीकडे लक्ष पुरविलें आहे, हे वाचकांस कळून आलॅच असेल. आमची ह्यासकट तीन पुस्तकें सभ्यां वाचकांपुढे आहेत, तेव्हां हातच्या कांकणाला आरसा नलगे. ह्यांत भाषांतराची पद्धत कशी आहे, भाष़ासरणी कितपत सुबोध आहे, उपोद्घातांतील गुणदोषविवेचन कितपत हृदयंगम आहे, तसेंच अर्थसा- दृष्यादि प्रकार कितपत बहुश्रुतपणाचा लाभ करून देणारे आहेत, इत्यादि गोष्टींचा प्रत्यय वाचकांस येण्यासारखा आहे. आणि कळविण्यास संतोष वाटतो, की हा आमचा यत्न महाराष्ट्रांतील थोर थोर मंडळीस पसंत पडला आहे