पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. Fisca आतांपर्यंत आक्ष शेक्स्पियर नाट्यमालेचा पहिला, दुसरा, तिसरा असे, तीन | खंड प्रगट करण्यास समर्थ झालों, हें सारे फळ आमच्या आश्रयदात्यांच्या, हाणजे पहिले वर्गाच्या वर्गणीदारांच्य कृपेचें होय, हे प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. पहिले वर्गाच्या वर्गणीसंबंधानें काय फेरफार केला आहे, हें विनंतिपत्रद्वारे प्रकाशक के. सी० त्यांस आगाऊ कुळकर्णी यांनी जाहीर केलेच आहे. त्यांच्या विनंतीस बहुतेकांनी मान दिला असून, आपला आश्रय कायम ठेवला, याबद्दल आक्षीं त्यांचे फार फार आभार मानतों. हा आमचा उद्योग केवळ लोकाश्रयावरच अवलं बून आहे. विनंतिपत्रकांत हाटल्याप्रमाणे, हें मराठी भाषे. च्या अभिवृद्धीचें एक कृत्य असून, ते तडीस नेण्याबद्दल सर्व मराठी भाषा बोलणारांस अभिमान असला पाहिजे.