पान:व्यायामशास्त्र.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३४] सांधे-शाररांत जे हाडाचे सांधे आहेत, त्यांना पुरेसे चलनवलन मिळाले नाही, तर त्यांमध्ये कांहीं द्रव्य सांचून त्यांचे चलनवलनास प्रतिबंध होतो व त्यामुळे सांधे दुखू लागून संधिवात वगैरे रोग जडतात. परंतु व्यायामाने सांधे खुले राहून त्यांची संधिवंधने बळकट होतात. यामुळे संधिवातादि रोग जडण्याची भीति रहात नाहीं. मेंदू-शरिराच्या हालचालीस मूळ प्रेरणा मेंदूतील कांहीं स्थानांपासून मिळते. शरिरास व्यायाम मिळाला नाही, तर ही मेंदूतील स्थाने दुर्बल होतात व या भागाच्या दुर्बलतेमुळे सर्व मेंदूसही अंशतः दुर्वलता येते. परंतु व्यायामाने या भागांचा विकास चांगला होतो व त्यामुळे सर्व मेंदूची शक्ति वाढते. शिवाय व्यायामाने मेंदूस शुद्ध रक्ताचा भरपूर पुरवठा होतो; यामुळे त्याची शक्ति वाढते. | व्यायामाने अन्नपचन चांगले होऊन जास्त रक्तोत्पत्ति होत असल्यामुळे व रक्ताचा पुरवठा सर्व भागांस होत असल्याने, त्या योगाने सर्व भागांचे चांगले पोषण होऊन त्यांस पुष्टि व काम करण्याची शक्ति ह्या प्राप्त होतात. व्यायामाचे सामान्य परिणाम. | व्यायामाने भूक चांगली लागते, अन्नास जास्त गोडी येते व मनास आनंद वाटतो. यामुळे मन उत्साही व तरतरीत राहते. शिवाय व्यायामाने तारुण्यावस्था थोडी उशिराने येते. म्हणजे व्यायामाने ब्रह्मचर्याचा काल वाढतो.