पान:व्यायामशास्त्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३३] शरिराचा बहुतेक भाग जर स्नायुमय आहे, तर शरिराचें योग्य पोषण होण्यास शरिरांतील स्नायूंचे योग्य पोषण झालें पाहिजे हे उघड आहे. व्यायामाने सर्व स्नायूंचा संकोच-विकास होतो व या संकोच-विकासाचे योगाने त्यांच्यामध्ये रक्ताचा प्रवाह जोराने चालू होऊन त्यांचे चांगले पोषण होते, आणि त्यांच्यांतील घाण भाग बाहेर ढकलला जातो. अशा रीतीने सर्व शारिराचे योग्य पोषण स्नायूंच्या संकोच-विकासाने होते. । पचनद्रियें-अन्नाचे पचन होण्यास त्यामध्ये पचनेंद्रियांत तयार होणारे पाचक रस पडावे लागतात, व अन्न चांगले कुसकरले व घुसळले जावे लागते. पाचक रस ज्या इंद्रियांत तयार होतात, त्यांतून ते पिळून निघण्यास व अन्नाचें घुसळणे चांगल्या रीतीने होण्यास पचनेंद्रियांचा संकोच व विकास जोराने व्हावा लागतो आणि तो जोराने होण्यास त्या इंद्रियांच्या स्नायूंमध्ये उत्तम लवचिकपणा पाहिजे. हा लवचिकपणा व्यायामाचे योगाने येतो. त्वचा-व्यायामाने शरिरांतून घाम वाहू लागतो.घाम हा शरिरांतील मळ व अर्थात् शरिरास अपायकारक पदार्थ आहे. यामुळे शरिरांतून घाम बाहिल्याने त्यांतील मल नाहीसा होऊन शरीर निरोगी होते. घाम घालविण्याचे काम त्वचेचे आहे व ही क्रिया करण्याचे त्वचेचे सामर्थ्य व्यायामाचे योगाने वाढते. ( त्वचेतून जाणा-या पाण्याचे प्रमाण व्यायामाने दुप्पट होते असा अनुभव आहे.) हाडे-व्यायामाने इतर सर्व भागांप्रमाणे हाडांसही रक्ताचा भरपूर पुरवठा होऊन त्यांची वाढ चांगली होते.