पान:व्यायामशास्त्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ था. वरिपूर्ण (सर्वगुणसंपन्न) व्यायामपद्धति कोणती? ၁၁၁၁၁၁ परिपूर्ण व्यायामपद्धति कशी असावी ? व्यायामापासून होणारे जे फायदे पूर्वी सांगितले आहेत, ते पूर्णत्वाने होण्यास व्यायामही योग्य प्रकारचा पाहिजे. म्हणून | योग्य प्रकारचा व्यायाम कसा असतो हे समजावे यासाठी त्याची | लक्षणं पुढे दिली आहेत. । १ व्यायाम शरिराच्या सर्व भागांस झाला पाहिजे-- शरीर में इमारतीसारखे आहे. इमारत मजबूत होण्यास तिचे सव भाग मजबूत असावे लागतात. त्यांतील एखादा भाग ( उदाहरणार्थ एका बाजूची भिंत किंवा एक तुळई ) मजबूत नसेल, तर इतर भाग चांगले असूनही इमारत लवकर पडेल, तसेच शरिराचे आहे. शरिराचा एखादा भाग अशक्त असेल, तर इतर भाग सशक्त असूनही एका अशक्त भागामुळे शाररास विकार होईल, किंवा मृत्यु लवकर येईल. इतर शरीर चांगले असूनही केवळ रक्ताशय दुर्बळ किंवा रोगयुक्त असल्याकारणाने अकाली मृत्यु आल्याची उदाहरणे पुष्कळ पाहण्यांत येतात. या करितां शरिराचे सर्व भाग सशक्त असणे इष्ट आहे. व्यायाम शरिराचे सर्व भागांस झाला नाही, तर कांहीं भाग अशक्त राहतील