पान:व्यायामशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[७] दोन आणि इतर प्रत्येक बोटाचीं तीन याप्रमाणे चार बोटांची बारा; मिळून एकंदर तीस. दोन्ही हातांची मिळून साठ. | पायाच हाडे–मांडीचे एक; गुडघ्याच्या वाटचे एक; तंगडीची दोन; घोट्याजवळचे सांध्याची सात; तळपायाचीं पांच; व पांच बोटांची [ हाताचे बोटाप्रमाणेच ] चवदा; मिळून एका पायाचीं तीस. दोन्ही पायांची मिळून साठ. मेंदू व मज्जातंतु अथवा ज्ञानतंतु. मस्तकाच्या कवटीच्या आतील सर्व भाग मेंदूने व्यापिला आहे. मेंदूचे मोठा मेंदू व लहान मेंदू असे दोन भाग आहेत. पैकी मोठा मेंदु लहान मेंदूच्या आठपट मोठा असून त्याने मस्तकाचा वरचा बहुतेक भाग व्यापला आहे. कवटीच्या मागील भागीं लहान मेंदू आहे. मेंदूपासून एक जाड फांटा निवून तो पाठीच्या कण्यामधील बोगद्यासारख्या पोकळ भागांतून कण्याच्या शेवटापर्यंत गेला आहे. मेंदू व हा फाटा यांस तंतु फुटून त्यांचे फाटे सर्व शाररांत पसरले आहेत. यांस ज्ञानतंतु किंदा मज्जातंतु म्हणतात. या तंतूचे पुढील फांटे इतके बारीक व असंख्य आहेत की, शारराच्या कोणत्याही भागावर सुईचे टोंक ठेवले तर त्याच्या खाली एखादा तरी ज्ञानतंतु सांपडल्याखेरीज राहणार नाहीं. ज्ञान व विचार यांचे मुख्य इंद्रिय मंदू होय. स्पर्शज्ञान ज्ञानतंतूंनी होते. आपण जेव्हां हातपाय हालवितो, तेव्हां ते हालविण्याविषयींची आज्ञा त्या त्या अवयवास नेऊन पोहचविण्याचे कामही ज्ञानतंतु करितात.