पान:व्यायामशास्त्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[८] " ज्ञानतंतु शाररांतील तारायंत्राप्रमाणे होत. शरिरांतील बातमी मेंदूस व मेंदूचा हुकूम शरिरास या तारायंत्राच्या योगानं समजतो. चनेंद्रियें. अन्न ताडांत पडल्यानंतर ते मलरूपाने बाहेर पंडेपर्यंत ज्या नलिकेतून जाते ती नळी, व ज्या इंद्रियांतील रसांचे अन्नावर कार्य घडते, ती इंद्रियें या सर्वांस पचनेंद्रियें हैं नांव दिले आहे. शरिरामध्ये ज्या नळ्या आहेत, त्यांपैकी अन्ननलिका हीं सर्वांत मोठी नळी होय. तिची लांबी सुमारे १६ हात असते. अन्नाचे पचन करून त्याचा शेष निरुपयोगी भाग टाकून देण्याचे काम या नळीचे आहे. ह्या नळीचे मुख्य भाग पुढील प्रमाणे आहेत. अन्नमार्ग, कोठा, लहान आतडे व मोठे आंतों. पचनेंद्रियांचे इतर भाग-तोंडांत लाला-पिंड आहेत. त्यांपासून लाळ उत्पन्न होते. लाळ अन्नांत मिसळल्याने अन्नपचनास मदत होते. कोट्याजवळ यकृत् व स्वादुपिंड म्हणून दोन इंद्रिये आहेत. ती अनुक्रमें पित्त व स्वादुरस हे रस उत्पन्न करून अन्नांत आणून सोडतात. त्यांच्या योगाने अन्नपचनास मदत होते. ही सर्व इंद्रिये पचनेंद्रियांचेच भाग होत. अन्नाचे जे तीन मुख्य प्रकार आहेत, त्यांचे पचनाची स्थाने पुढे दिल्याप्रमाणे आहेतः| मांसात्पादक अन्नाचे पचन कोट्यांत होते. . पिष्टमय (स्टाच) अन्नाचे अंशतः पचन तोंडांत व पूर्ण पचन आंतड्यांत होते.