पान:व्यायामशास्त्र.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट क. -:*:-- मूलरची व्यायामपद्धति. जे. पी. मूलर म्हणून एक डॅनिश गृहस्थ आहे, त्याने जी व्यायामपद्धति सुरू केली आहे, तींतील व्यायाम पुढे दिल्याप्रमाणे आहेतः| प्रारंभीं चांगला आळस द्यावा; म्हणजे दोन्ही हात वर करून व बोटांत बोटें उलटी अडकवून सर्व अंग चांगलें ताणावे. या ऐवजी पुढील कृति केली तरी चालण्यासारखे आहे. ( १ ) भिंतीकडे पाठ करून भिंतीपासून एक हातावर उभे रहावे. हात दोन्ही बाजूस ताठ पसरावे. नंतर शरीर पाठींत वाकवून डोके व हात भिंतीस टेकेंतोपर्यंत शरिराची कमान करावी. अथवा ( २ ) अंथरुणावर उताणें निजून डोक्यावर भार देऊन शरिराची कमान करावी. ( आळस देण्याच्या या दुस-या प्रकाराचा उपयोग विशेष सशक्त लोकांनीच करावा. ) व्यायाम १ ला. पावलांमध्ये एक हात अंतर ठेऊन हात वर पसरावे व तळहात वरच्या बाजूस होईल, अशा रीतीने हाताची बोटे एकांत एक अडकवावी. बाह कानांस चिकटून असावे. घाण्याच्या लाटेप्रमाणे धड कमरेभोंवतीं ५ फे-या होईतोपर्यंत फिरवावे. पुढलि बाजूने फिरतांना कणा ताठ ठेवावा. असेच उलट दिशेने ५ वेळां फिरावें. धड पुढील बाजूने फिरतांना श्वास सोडावा व मागील बाजूने फिरत असतां श्वास घ्यावा. या व्यायामानें घेरी येईल तर तो प्रथम करू नये. कमरेवर हात ठेऊन वरील व्यायाम केल्याने तो सोपा जाईल.