पान:व्यायामशास्त्र.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १३०] ११ १० }} }, १३ १ १५ व्यायामाचा नंबर. हातांची संख्या. वाढविण्याचे प्रमाण. १० दोन दिवसांनी एक १२ तीन दिवसांनी, १४ २५ रोज दोन दिवसांनी १ सँडोच्या व्यायामपद्धतींतील गुणदोष. | गुण---(१) बहुतेक सर्व स्नायूंना व्यायाम मिळतो. (२) व्यायाम क्रमाने वाढवितां येतो. ( ३ ) निरनिराळ्या स्नायूंकरितां निरनिराळे व्यायाम असल्यामुळे आपल्या शरिराच्या जरूरीप्रमाणे व्यायामांत फरक करितां येतो. दोष----तालमींतील इतर व्यायामांत जे दोष सामान्यतः आढळून येतात, ते ह्या पद्धतींतही आहेत; ते येणेप्रमाणे:- ( १ ) ती कंटाळवाणी वाटते. ( २ ) तिजमधील श्रम व्यवहारांतील श्रमास सोडून असल्यामुळे खरी शक्ति वाढविण्यास त्यांचा व्हावा तितका उपयोग होत नाहीं. ( ३ ) व्यायाम सावकाश करावयाचे असल्यामुळे त्यांपासून चपळाई किंवा तडफ येत नाहीं. ( ४ ) शरिराच्या वरच्या भागाच्या मानाने खालच्या भागास ( पायांस, मुख्यतः तंगड्यांस ) व्यायाम होत नाहीं. ह्यांशिवाय पुढील दोषही तिजमध्ये आढळून येतो. 7. तिला जी उपकरणे ( ग्रिप डंबेल वगैरे ) लागतात, त्यांना किंमत वीच पडत असल्यामुळे तिचा गरीब विद्यार्थ्यास व्हावा, तितका उपयोग होत नाहीं.