पान:व्यायामशास्त्र.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १३२ ] व्यायाम २ . पूर्व तयारी—लहानशा स्टुलावर किंवा कोणत्याही उंच पदार्थावर एक पाय ठेऊन उभे रहावे व दुसरा पाय अधांतरी लोंबत धरावा. अधांतरी असलेला पाय मागे व पुढे नेववेल तितका जोराने व झटक्याने न्यावा. हे करीत असतां, पाऊल वाकवून, ते पायाच्या सरळ रेषेत येईल असे धरावें. असेच दुस-या पायाने करावे. हा व्यायाम प्रत्येक पायाने १६ वेळां करावा. व्यायाम ३ रा. ( सँडोच्या १५ व्या व्यायामाप्रमाणेच, परंतु विशेष सशक्त लोकांनी जमिनीस पाठ टेकू न देत हा व्यायाम करावा. वर उठतांना हात डोक्याचे पढे येऊ देऊ नयेत. पडतांना श्वास घ्यावा व उठतांना श्वास सोडावा. हा व्यायाम १२ वेळा करावा. ) व्यायाम ४ था. - यारी-पावलांमध्ये दीड हात अंतर ठेऊन उभे रहावे. नंतर तोंड व धड उजवीकडे वळवावे; हात ताठ पसरून धरावे व हाताच्या मुठी मिटाव्या. या हाताची मूठ भुईस लागे तोंपर्यंत डाव्या बाजूकडे कमरेत वांकावे. । ताठ उभे होऊन डाव्या बाजूकडे धड वळवून पूर्वीप्रमाणे उजव्या हाताची मूठ भुईस टेके तांपर्यत उजव्या बाजूकडे कमरेत वांकावे, यामा प्रत्येक बाजूस पांच पांच वेळां वांकावे. व्यायामाने पोटाच्या बाजूचे स्नायु व यकृत् यांस बळकटी येते. विशेष अशक्त लोकांनी हा व्यायाम करू नये. व्यायाम ५ वा. पूर्व तयारी--एक पाय दुस-या पायाच्या पुढे १॥-२ हात अंतरावर ठेवावा. दोन्ही हात बाजूस ताठ पसरून धरावे. संपूर्ण हात चक्राकार फिरवून, हाताने १६ वर्तले काढावी. पैक्रीं शेवटची तीन वर्तलें शक्य तेवढी मोठी घ्यावी. हा व्यायाम करतांना शरीर