पान:व्यायामशास्त्र.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२७ ] व्यायाम १३ वा. पूर्व तयारी-तळहात खांद्याजवळ भईवर टेकून व कोंपरें वर करून भुईवर पालथे निजावें. पाठ आतील बाजूस वाकवून तळहातावर जोर देऊन छाती व सर्व अंग सावकाश वर उचलावे. हात ताठ होईपर्यंत अंग उचलल्यावर फिरून साव काश अंग खालीं नेत नेत पूर्व स्थितीप्रत यावे. हे करीत असतां पाय, गुडघे व एकंदर शरीर ताठ ठेवावे, व पायाचे आंगठे व तळहात यांशिवाय शरिराच्या कोणत्याही भागाचा जमिनीस स्पर्श होऊ देऊ नये. व्यायाम १४ वा. पूर्व तयारी–तळहात डोक्याखाली ठेऊन अथवा सर्व हात ताठ मागे पसरून पाठीवर उताणे निजावे. आळीपाळीने डावा व उजवा पाय सावकाश वर उचलावा. हे करीत असतां गुडघे ताठ ठेवावे व व्यायाम संपेपर्यंत टांचा भुईस टेकवू नयेत. स्नायु–पोटाच्या खालच्या भागांतील व कमरेतील. व्यायाम १५ वा. पूर्व तयारी-हात ताठ पसरून पाठीवर निजावें. धड सावकाश उचलावे व हातांतील डंबेल्स पायाचे बोटांचे पुढे जाईतोंपर्यंत, कमरेंत शरीर वांकवावें फिरून धड मागे नेऊन पूर्वीप्रमाणे सावकाश निजावे. हे करीत असतां शरिरास झटका देऊ नये. स्नायु-पोटाच्या वरच्या भागांतील. व्यायाम १६ वा. ( १४ प्रमाणेच, परंतु दोन्ही पाय एकदम वर करावे. ) व्यायाम १७ वा. पूर्व तयारी–टांचा एकीस एक लावून परंतु आंगठे तिरके बाहेरचे बाजूस चळलेले ठेवून उभे रहावे. हात खाली सोडावे. नंतर टांचा वर उचलून चव - ड्यावर उभे राहावे.