पान:व्यायामशास्त्र.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२६ ] मनगटांतील स्नायु चांगले कुसकरले जातील अशा रीतीने मनगट मागे पुढे वाकवावे. त्याचप्रमाणे मनगटाजवळ मूठ वाटोळी भराभर फिरवावी. स्नायु–मनगट वांकविणारे व ताठ करणारे स्नायु; तसेच अपतानक व उत्तानक. व्यायाम ९ वा. पूर्व तयारी--( ८ ) प्रमाणे उभे राहून डेवेल्सचे दांड्यावर तर्जनी पसरून मुठीमध्ये डंबेल्सचे एक शेवट धरावें. मूठ मनगटाचे सांध्यावर कोणत्या तरी एका दिशेने चक्राकार फिरवून डंबेल्स फिरवाव्या. स्नायु–(८) मधील सर्व. व्यायाम १० वा. सर्व क्रिया (९ ) प्रमाणेच; फक्त डंबेल्स पूर्वीच्या उलट दिशेने फिरवाव्या. व्यायाम ११ वा. पूर्व तयारी-- उजवा आंगठा उजवीकडे व डावा अंगठा पुढे राहील ( म्हणजे डावा पाय सरळ व उजवा पाय डाव्या पायाशी काटकोन करून राहील ) असे उभे राहावें. अग्रहस्त आडवे होतील अशा रीतीने हात कोपराजवळ वांकवावा. कोपरे पार्श्वभागास लागून धरावी. उजवे पाऊल उचलून व उजवा पाय गुडघ्यांत वाकवून समोरचे बाजूस दोन हात अंतरावर पाऊल ठेवावे. त्याचवेळी छाती पुढे फेंकांवी व डावा हात पुढे सरसावून तो ताठ पसरावा. हे करतांना डावा पाय ताठ ठेवावा. हात ताठ पसरग्याची क्रिया पाऊल भुईवर पडण्याचे थोडी अगोदर व्हावी. नंतर उजवा पाय चटदिशीं मागे आणून पूर्व स्थितीप्रत यावे. स्नायु–करपत्र, उरोज, पुढील अधिस्कंध, विशाल व चतुष्पद, व्यायाम १२ वा. ( पूर्वीप्रमाणेच पण बाजू बदलून डावा पाय व उजवा हात याने वरील क्रिया करावी. )