पान:व्यायामशास्त्र.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२२ ] पान ९६, शेवटची ओळ. रक्ताशय मजबूत करणारे जे व्यायाम दिले आहेत, ते, ज्यांना रक्ताशया. संबंधी रोग [ Heart disease ] झाला असेल, त्यांनी मुळीच करू नये. त्या व्यायामांनी त्यांचा विकार जास्त होईल एवढेच नव्हे, तर वेळेनुसार प्राणनाशही होईल. पान ९७, * फुफ्फुसांचा विकास करण्यास प्राणायाम हा उपाय सांगितला आहे, त्याप्रमाणे गायन हा उपायही सांगितला पाहिजे. गायनाचा अभ्यास अनेक दृष्टींनी उपयुक्त आहे. त्यापासून चित्त उल्लसित राहते व मनोवृत्ति सुसंस्कृत होतात, हा फायदा आहेच; पण त्या योगाने फुफ्फुसांस बळकटी येते, हा आरोग्यदृष्ट्या विशेष महत्त्वाचा फायदा आहे. फुफ्फुसे विकृत होऊन पुढे क्षय होईल, असे वाटल्यावरून एका रोग्यास गाण्याचा अभ्यास करण्याविषयी वैद्याने सांगितल्याचे व या उपायापासून त्या रोग्यास फायदा झाल्याचे उदाहरण आमचे पाहण्यांत आहे. ह्या दृष्टीने पाहतां सकाळीं भूपाळ्या व धर्मविषयक गीते म्हणण्याची आपल्यामध्ये जी चाल आहे ती फार चांगली आहे, असे दिसून येईल. ह्यास्तव ह्या चालीचा योग्य उपयोग लोकांनी करून घ्यावा. पान १०५, ओळ ८. बद्धकोष्टता उत्पन्न करणाच्या पदार्थांमध्ये पुढील पदार्थांचाही समावेश होतोलाडू, पिठले, शिरा, शेवग्याच्या शेंगा व मेथी, भोपळा, वगैरे भाज्या. पान ११०. बाजरी व ज्वारी यांचे घटकांश पुढे दिल्याप्रमाणे आहेतः| मांसोत्पादक भाग. पिष्टमय भाग, स्निग्ध भाग. क्षार. बाजरी ७२। । ३६ ज्वारी | ६३ ५'३ ५'३ . २ १० ११ ६३