पान:व्यायामशास्त्र.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२१ ] पान ३२. विश्रांतीचे वेळीं व श्रम करतांना होणारे आक्सिजनचे ग्रहण आणि कार्बनिक असिड, वायु, पाणी, युरीया या मलांचे उत्सर्जन, यांत फरक काय पडतो, हें पुढील कोष्टकावरून दिसून येईलः ग्रहण उत्सर्जन ऑक्सिजन का. आसिड पाणा युरीया विश्रांतीचे वेळी ७०८९ ९११५८२८ ३७२ १२८४२. २०४२१ ३७ श्रम करीत असतां ९५४५ पान ४१ ओळ १९. * शिकार '–शारीरिक संपत्तीच्या दृष्टीने शिकारीचा व्यायाम आवश्यक असला, तरी तो नीतिदृष्टया अगदीं अयोग्य आहे हे ध्यानात ठेविले पाहिजे. पान ६१, ओळ १७. शक्तीच्या निर्म' [ अर्धशतया ]--अर्धशक्तीचे लक्षण पुढील प्रमाणे सुश्रुतांत दिले आहे. हृदि स्थानस्थितो वायुर्यदा वक्त्रं प्रपद्यते । व्यायाम कुर्वतो जंतोस्तब्दलार्धस्य लक्षणम् ॥ पान ९०. दुस-या पॅन्यांत ' यकृत् स्नायुरूपी तंतूचे बनलेले आहे,' वगैरे जे विधान केले आहे, ते बरोबर नाहीं. | पान ९६, ओळ ३. * खणणे '–खणण्याच्या व्यायामाने जो फायदा होतो, तोच लांकडे फोडण्याच्या श्रमानेही होणारा आहे. । पान ९६, ओळ २०. * पोहणे '–पोहण्याचा व्यायाम हा उत्तम प्रकारच्या व्यायामांपैकी एक आहे. त्याने छातीस व फुफ्फुसांसही बळकटी येते. मात्र हा व्यायाम सशक्तांच्याच उपयोगी आहे.