पान:व्यायामशास्त्र.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ब -:*: - अलीकडील युरोपियन तालमचे खरूप कसे असते, हे समजावे व ह्या पुस्तकांत ४५--४७ पानांत व्यायामपद्धतीचा जो एक नमुना दिला आहे, त्यांची तुलना युरोपियन व्यायामपद्धतीशी करता यावी, ह्यास्तव ह्या व पुढील परिशिष्टांत युरोपियन व्यायमपद्धतीचे दोन नमुने दिले आहेत. सँडोची व्यायामपद्धति. व्यायाम करतांना त्या त्या अवयवावर मन एकाग्र करणे, हे सँडोच्या पद्धतीचे मुख्य तत्त्व आहे. सँडोचे व्यायाम योग्य रीतीने व्हावे, याकरितां त्याने तीन व्यायामोपकरणे तयार केली आहेत. यांपैकी पहिले उपकरण स्प्रिंगयुक्त डंबेल होय. दुस-या दोन उपकरणांचे वर्णन देण्याची विशेष आवश्यकता नाहीं. स्प्रिगयुक्त डंबेल्स-एका डंबेलची दोन उभी छकले करून त्यांमध्ये ( तारेची गुंडाळी करून केलेल्या ) स्प्रिग्ज बसविलेल्या असतात. ह्या डंबेलला ‘ स्प्रिंग ग्रिप डंबेल' हे नांव दिले आहे. ही डंबेल हातामध्ये धरली म्हणजे तिची दोन छकलें एकमेकांस चिकटण्याकारतां मूठ जोराने दाबावी लागते. ही क्रिया करतांना मुठीवर मनाची एकाग्रता करावी लागते. या योगाने एकाग्रतेचे तत्त्व अंशतः साधते, असे सँडोचे म्हणणे आहे. ही एकाग्रता कृत्रिम आहे व तिचा उपयोग फक्त हातांसंबंधानेच होतो; म्हणून या एकाग्रतेचे महत्व फारसे नाही असे दिसून येईल. तथापि ज्यांना अवयवावर मनाची एकाग्रता मुळीच करता येत नाही, त्यांना ह्या साधनापासून थोडा उपयोग होईल. संडाच्या व्यायामपद्धतींतील निरनिराळे व्यायाम ( पुढील व्यायामांपैकी १३ व्या व्यायामाखरजि इतर सर्व व्यायाम हातांत डंबेल्स घेऊन करावयाचे असतात. ) व्यायाम १ ला. पूर्व तयारी–उभे रहावे. हात बाजूला सोडावे. दंड कुशीबरोबर घट्ट दाबून धरावे-म्हणजे पार्श्वभागास दाबून राहतील असे ठेवावे. तळहात मागील बाजूस येईल अशा रीतीनें मूठ धरावी.