पान:व्यायामशास्त्र.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११४ ] आढळून येतो. ) खालें नाहीं तर थकवी वाटतो, अशी ज्यांची स्थिति. असेल त्यांनींच खाण्याच्या वेळा वाढविणे इष्ट आहे. परंतु तशी स्थिती नसेल तर खाण्याच्या वेळा कमी ठेवणेच फायद्याचे आहे. दिवसांतून ३।४ वेळां खाणान्या लोकांपैकी ज्यांना क्षुधामांद्य असेल अशांनी आपली खाण्याची एकादी वेळ कमी करून काय अनुभव येतो हे पहावे; म्हणजे वेळ कमी करण्याने आपली भूक वाढली आहे, असेच त्यांना आढळून येईल. ५ जेवतांना मन आनंदांत ठेवावे व त्यावेळी इतर विषयांची विचार करू नये. तसेच जेवतांना किंवा जेवणानंतर रागावण्याचे प्रसंग टाळावे. जेवणानंतर निदान अर्धा तासपर्यंत कसलेही श्रम करूं नयेत. जेवतांना रागावण्याने किंवा विचार करण्याने, तसेच भोजनानंतर कोणतेही श्रम करण्याने, रक्ताचा प्रवाह शरिराच्या इतर भागांत जास्त गेल्यामुळे पोटांतील रक्ताचा प्रवाह कमी होतो, व या योगाने पचनक्रिया चांगली होत नाहीं. ६ जेवतांना पाणी होतां होईल तितके थोड़े प्यावे. जेवतांना फार पाणी प्याल्याने पोटांतील जाठर रस पातळ व निर्बल होतो. त्यामुळे त्याचे कार्य अन्नावर चांगले होत नाहीं, व अर्थात् अन्नपचनही चांगले होत नाही. जेवणानंतर सुमारे दीड दोन तासाने पाणी पिणे चांगले. अपचनामुळे पोटदुखी झालेस्या एका गृहस्थाची पोटदुखी, जेवतांना पाणी पिण्याचे सोडून दिल्यामुळे, गेल्याचे उदाहरण पाहण्यांत आहे. तथापि यासंबंधाने एकदम बदल करण्यापासून त्रास होईल तर तो क्रमाक्रमाने करावा.