पान:व्यायामशास्त्र.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११७ ) २. अन्नाचे पचन झाल्यावांचून त्याचा कांहीं उपयोग नाहीं. अन्नाचे योग्य पचन होण्यासतें नियमित असावे लागते; एवढेच नव्हे, तर त्यास मोकळ्या हवेतील व्यायामाची आवश्यकता आहे. म्हणून : शरीरपुष्टीची इच्छा करणारांनी केवळ चांगलें अन्न खाऊन स्वस्थ न राहतां व्यायाम करणे आवश्यक आहे. . ३ अन्न उत्तम रीतीनें चावावे. ज्या अन्नाचे चांगले चर्वण होत नाहीं, त्याचे पचन होत नाही. म्हणून असें-अन्न खाऊन न खाल्लयासारखेच आहे. प्रत्येक घांस चाळीस वेळां चघळावा, असा एका डाक्टरार्ने नियम सांगितला आहे. भराभरा खाल्लेल्या अन्नापेक्ष नीट चघळून खाल्लेले अन्न थोडे पुरते व त्यापासून अंगांत ताकद जास्त राहते, असे अमेरिकेंत केलेल्या अनेक प्रयोगांवरून सिद्ध झालें आहे. १. ४ आहार दिवसांतून तीनदां किंवा फार झाले तर चारदां करावा. ज्यांना वरचेवर काम करावे लागते व ज्यांचे नित्य व्यवसायांत शारीरिक श्रम ब-याच मानाने असतात. अशांनीं, व लहान मुले व तरुण लोक यांनी, चारदां आहार करावा. परंतु जे लोक विशेष शारीरिक श्रम करत नाहीत, त्यांनी दोन किंवा तीन वेळांपेक्षा जास्त वेळी आहार करू नये. ( युरोपियन लोक अनेकदां खातात असे पाहून त्यांचे, फक्त खाण्याच्या बाबतींत अनुकरण करणारांस अनुलक्षून वरील म्हणणे आहे. इतर लोकांस हे म्हणणे लागू नाहींच; कारण, त्यांच्यामध्ये वाजवीपेक्षा जास्त वेळ खाण्याचे दोषापेक्षा वाजवीपेक्षा कमी वेळ खाण्याचा दोषच विशेष