पान:व्यायामशास्त्र.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट अ. --::- व्यायामशास्त्र या पुस्तकांतील काही गोष्टींचे स्पष्टी करणार्थ टपा. | पान ७, ओळ १२. * एक जाड फांटा'-या फांट्यास मेंदूचे शेपूट म्हणणे जास्त योग्य होईल. पान ९, ओळ ६. * ६-१२ तास'-हा कमीत कमी काल आहे. अन्नाचा निकाल होण्यास २०-४० तासही कधी कधी लागतात. | पान १०, ओळ ५. ‘फुफ्फुसें'–रक्ताभिसरणाच्या इंद्रियांमध्ये फुफ्फुसांचा समावेश केला आहे, तो शास्त्रीय दृष्टया बरोबर नाही. कारण, फुफ्फुसे वास्ताविकपणे श्वासोच्छ्वासाच्या इंद्रियांमध्ये येतात. तथापि ह्या इंद्रियांचा रक्तशुद्धि व रक्ताभिसरण यांश निकट संबंध असल्यामुळे व प्रस्तुत पुस्तकांतील इंद्रियविज्ञानशास्त्रविषयक माहिती संक्षिप्त असल्यामुळे, त्यांचा समावेश रक्ताभिसरणाच्या इंद्रियांत केला आहे. पान १०, ओळ २०. * शीर' हा शब्द रक्तवाहिनी या सामान्य अर्थाने योजला आहे. त्याचा प्रस्तुत स्थली संदर्भावरून शुद्धरक्तवाहिनी अथवा धमनी असा अर्थ होतो. व्यवहारांत शीर या शब्दाचा उपयोग artery शुद्धरक्तवाहिनी, vein अशुद्धरक्तवाहिनी, tendon स्नायूचे शेवट, अशा निरनिराळ्या अर्थी होतो. पान ११, ओळ १०. ‘शरिरांतील प्रत्येक हालचाल' ह्या शब्दांवरून चाह्य हालचाली व आंतील हालचाली [ म्हणजे निरनिराळ्या इंद्रियांच्या क्रिया ] हा अर्थ समजावयाचा.