पान:व्यायामशास्त्र.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११४ ] शरीरास लागणारे महत्त्वाचे क्षार भाजीपाल्यापासून मिळतात. हे पदार्थ खाल्ले नाहीत तर रक्त शुद्ध रहात नाहीं व स्कव्ह रोग होतो. ) हिरड्यांतून रक्त वाहणे, हें स्कव्ह रोगाचे लक्षण आहे.) म्हणून ताजा भाजीपाला अवश्य खात जावा. भाजीपाला न मिळेल तर निदानी कागदी लिंबाचा उपयोग जवण्यांत करावा. | कांदे, बटाटे, टोमेटो यांच्या भाज्या रक्तशुद्धिकारक आहेत. टोमेटोची भाजी पाचकही आहे. म्हणून या भाज्यांचा उपयोग जेवणांत करावा. मात्र कांदा कामोत्तेजक असल्यामुळे विद्यार्थी व ब्रह्मचारी यांनी त्याचा उपयोग करू नये.. फळे—बहुतेक फळे पचण्यास हलकी असतात व त्यांपासून महत्त्वाचे क्षार व आसिडे (आम्लें) शरिरास मिळतात; म्हणून आहारामध्ये फळे अवश्य असावीं. जेवणानंतर फळे खाणे हितकारक आहे. कारण, फळांतील कांहीं पाचक रस अन्नास मिळून अन्नाचे पचन चांगले होते. बहुतेक फळांमध्ये मलशुद्धि करण्याचा धर्म आहे. ज्यांची ज्यांची म्हणून पचनशक्ति मंद आहे, त्या सर्व लोकांनी आहारामध्ये फळांचा विशेष उपयोग करावा. कांहीं फळांचे विशेष गुणधर्म पुढे दिल्याप्रमाणे आहेत. आंबा-फार पौष्टिक पण कांहींसा जड. ज्यांना अजीर्णाची व्यथा नाही, त्यांनी जरूर खावा. आंबा खाल्याने एकाचा + क्षयरोग गेल्याची हकीकत ऐकण्यांत आहे. + क्षीण करणा-या अनेक जीर्ण रोगांस ' क्षयरोग ' हे नांव सामान्य लोकांकडून देण्यांत येते. अशांपैकी वरील क्षयरोग असावा असे वाटते. खरा क्षयरोग अशा रीतीने बरा होणे अशक्य आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.