पान:व्यायामशास्त्र.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११३ ] • पचनास हलके असे पदार्थ पुढील होतः–दूध, तांदूळ, साबुदाणा, बदाम, बेदाणा, मनुका. ( सुपचनीय फळे—सफरचंद, द्राक्षे, डाळिंबे. • इतर नायट्रोजनविशिष्ट पदार्थ पुष्कळ असतांना पौष्टिकतेसाठी वरील पदार्थांचाच उपयोग मनुष्ये विशेष कां कारतात, याचे कारण वरील माहितीवरून समजून येण्यासारखे आहे. स्वस्त व पौष्टिक अशा पदार्थात भुईमुगाचा नंबर पहिला आहे. त्याचे खालोखाल मूग, हरबरा, हीं द्विदल धान्यें पौष्टिक आहेत. परंतु हे पदार्थ पचनास जड आहेत. तथापि ज्यांची पचनेंद्रियें चांगली आहेत, अशा गरीब मुलांनीं यांचा उपयोग करण्यास हरकत नाही. ज्यांना गरिबीमुळे दूध घेण्याचे सामर्थ्य नसेल त्यांनी या पदार्थांचा उपयोग जरूर करावा. तालीम करून भिजलेली हरब-याची डाळ खाण्याचा प्रघात आपल्याकडे कांहीं लोकांत आहेच. पचनास हलके असून स्वस्त असे स्निग्धान्न तीळ होय; म्हणून ज्या गरीब लोकांना तूप मिळत नाही, त्यांनी या पदार्थाचा उपयोग करावा. - खोबरें हा स्वस्त व पौष्टिक पदार्थ आहे. परंतु तो थोडा जड व कामोत्तेजक आहे; म्हणून तो चांगल्या पचनशक्तीच्या विवाहित मनुष्यांनी शक्तीकरितां खावा. अन्नासंबंधानें किरकोळ माहिती.–वाजवीपेक्षा जास्त शिजविलेले अन्न, तसेच तुपांत किंवा तेलांत तळलेले पदार्थ पचनास जड होतात. म्हणून असे पदार्थ खाण्यामध्ये फारसे येऊ नयेत.