पान:व्यायामशास्त्र.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८१ ] ठेक्याबरोबर किंवा वाद्याबरोबर तालांत व्यायाम करणें हैं बरेच मानसिक श्रम करणाच्या मुलांस विशेष उपयोगी आहे.-- मानसिक श्रम केल्याने मेंदूस थकवा येतो; म्हणून जे व्यायाम करतांना त्यांकडे लक्ष पुरवावे लागते,ते व्यायाम, मानासक श्रमानंतर लागलीच | केल्याने, त्यांचे योगाने मेंदूचा थकवा अधिक वाढून प्रकृतीस अपाय होतो. परंतु जे व्यायाम बँड अथवा पडघम यांच्या तालाबरोबर करावयाचे असतात ते ठेक्याच्या नादानें आपोआप आपल्याकडून होतात; म्हणून ते करतांना त्यांमध्ये विशेष लक्ष घालावे लागत नाहीं; ह्यास्तव ज्या मुलांना विशेष मानसिक श्रम पडतात, अशा मुलांना बँडबरोबर होणा-या कवायतीचा व्यायाम विशेष उपयोगी आहे. जो व्यायाम ठेक्याबरोबर केला जातो, त्यापासून फक्त स्नायूंनाच श्रम होत असल्यामुळे, अशा प्रकारचा व्यायाम केवळ स्नायुविषयक होय. जे व्यायाम करतांना व्यायामांकडे लक्ष द्यावे लागते त्या व्यायामांपासून केवळ स्नायूस नव्हे तर मेंदूसही श्रम होतात. म्हणून अभ्यास करून थकलेल्या मुलांना अशा प्रकारचे व्यायाम करावयास सांगणे म्हणजे त्यांच्या मेंदूचा थकवा वाढविणे आहे. याकरितां अशा मुलांस फक्त वाद्यांच्या ठेक्याबरोबर करता येणारे सोपे ( कवायतीसारखे ) व्यायाम सांगावे. व्यायाम करतांना गुडघे वांकवावे-तालमीपैकी जे व्यायाम उभे राहून करावयाचे असतात, ते करतांना गुडघे किंचित वाकवून मांडीचे स्नायु ताठ करावे. असे केल्याने पायांच्या स्नायूस ताण बसून त्यांस फायदा होईल.