पान:व्यायामशास्त्र.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८० ] स्नायु मजबूत करणान्या व्यायामांची त्यांना विशेष जरूरी असते. असे व्यायाम म्हणजे ज्यांमध्ये ओणवे व्हावे लागते अशा प्रकारचे होत. म्हणून श्रमाभावामुळे ज्यांचे पोटांना स्थूलता आली आहे. अशा स्त्रियांकडून केर काढणे, धुणे, पाणी ओढणे, वगैरे कामें अवश्य करवावी, व त्यांना रोज नाहीं तरो आठवड्यांतून एकदा तरी १।२ मैलांवर असलेल्या टेकडीवरील देवस्थान पाहण्यास न्यावे. लहान मुलांना व्यायाम त्यांच्या स्नायूंच्या वाढीच्या क्रमाने असावा.- शारिरातील स्नायूंच्या वाढीचा सामान्य क्रम असा आहे की, मोठे स्नायूंची वाढ आधीं होते, व लहान स्नायूंची वाढ उशिरा होते. धडाचे मोठे, स्नायु प्रथम, त्यानंतर खांदा व कमर यांचे स्नायु (म्हणजे ज्या ठिकाणी अवयव धडास जोडले आहेत त्या ठिकाणचे स्नायु ), त्यानंतर मनगट व घोटा यांचे स्नायु व त्यानंतर बोटाचे स्नायु पारेपूर्ण दशेस येतात, असा सामान्य नियम आहे. बोटांच्या स्नायूंची वाढ १३।१४ वर्षांच्या सुमारास होते, म्हणून या वर्षांपर्यंत मुलांकडून जे व्यायाम करवावयाचे ते वर सांगितलेल्या क्रमास धरून असावे. म्हणजे अगदी लहानपणी धावण्याचा व्यायाम विशेष असावा, हाताने श्रम करण्याचा त्यापेक्षां कमी असावा, व बोटांनी श्रम करण्याचा त्याहून फार कमी असावा. सिंगलबारचे व्यायामांत बोटे, मनगट व खांदे यांचे स्नायूस विशेष श्रम पडतात, म्हणून १३।१४ वर्षांपूर्वी हे व्यायाम मुलांकडून करवू नयेत.