पान:व्यायामशास्त्र.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ८ वा. व्यायामपद्धतीच्या भिन्न प्रकारांचे मूळ स्वरूप शरिरांतील सर्व स्नायू बळकट करणे हा व्यायामाचा मुख्य हेतु आहे. स्नायूंचे काम शरिरांतील निरनिराळ्या हालचाली घडवन आणणे हे आहे. तेव्हां जेवढ्या म्हणून निरनिराळ्या हालचाली आहेत, तेवढ्या केल्या म्हणजे सर्व स्नायूंना व्यायाम मिळाल्यासारखेच झाले. म्हणून शरिराच्या सर्व भागांस बळकटी आणण्यास, शरिरांत जेवढ्या निरनिराळ्या हालचाली होणे शक्य आहे तेवढ्या करणे हा एक मार्ग आहे. अशा भिन्न हालचाली पढे दिल्याप्रमाणे आहेत. ह्या सर्व हालचाली रोज केल्या म्हणजे सर्व शरिरास मजबुती आल्यावांचून राहणार नाही. ज्यांस कसरतीची किंवा तालमीची नवीन पद्धति बसवावयाची असेल त्यांनी पुढे दिलेल्या हालचालींचे भिन्न संयोग आपापल्या सोईप्रमाणे करावे. निरनिराळ्या युरोपियन मल्लांनी ज्या व्यायामपद्धति काढल्या आहेत, त्या, पुढे सांगितलेल्या भिन्न हालचालींचे विशेष प्रकारचे संयोगच आहेत. ह्यास्तव या पद्धतीचे तत्त्व लक्षात येण्यास पुढील माहितीचा उपयोग होईल अशी आशा आहे.