पान:व्यायामशास्त्र.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७२ ] अशा ) व्यायामांपेक्षा जास्त उपयोगी आहेत.–अवघड ... व्यायामाने शक्ति.वाढते, परंतु केवळ शक्तीच्या उपयोगाचे प्रसंग व्यंवहारांत फारच थोडे येतात. म्हणून असे व्यायाम विशेष उपयोगी नाहीत. परंतु सहनशक्ति व चपलता दाखविष्याचे प्रसंग व्यवहारांत अनेक येतात, व अशा वेळी ती शक्ति आपल्या आंगीं नसल्यास आपल्या प्रकृतीस अपाय होतो. शिवाय शत्रूचा प्रतिकार करण्याची शक्ति व रक्तशुद्धि ह्या ज्या गोष्टी व्यायामापासून आपणास साधावयाच्या असतात, त्या वरील प्रकारचे व्यायामापासून जशा साध्य होतात तशा शक्ति वाढविणा-या अवघड व्यायामापासून होत नाहींत. म्हणून अशा प्रकारच्या व्यायामांचे महत्त्व सामान्य लोकांस विशेष आहे. | व्यायाम करीत असतां व्यायामाचे मानाने मानसिक श्रम कमी केले पाहिजेत. शारीरिक व मानसिक श्रम करण्यास लागणा-या एकंदर शक्तीची मर्यादा ठरलेली असते. या मर्यादेच्या बाहेर श्रम झाल्यास शरिरास अपाय होतो हें पूर्वी दाखविलेंच आहे. म्हणून या मर्यादेचे अतिक्रमण होऊ देऊ नये. यास्तव तालीम करण्यास प्रथम आरभ केला असतां, अथवा एकाद्या दिवशीं जास्त शारीरिक श्रम केले असतां, मानसिक श्रम त्या मानाने कमी करावे. ज्याप्रमाणे बुध्दीच्या निरनिराळ्या भागांचीं स्थाने मेंदूत आहेत, त्याप्रमाणे निरनिराळ्या अवयवांच्या हालचाळींची प्रेरणा जेथे उत्पन्न होते अशी कांहीं स्थाने मेंदूमध्ये आहेत. अर्थात् शारीरिक श्रम विशेष झाल्याने मेंदूतील या भागांस