पान:व्यायामशास्त्र.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७३ ] थकवा येतो. या योगानं मानासिक श्रम करण्याने मेंदूचे सामर्थ्य कमी होते. म्हणून ज्या मानाने आपले शारीरिक श्रम वाढतील त्या मानाने आपण मानसिक श्रम कमी केले पाहिजेत. शरीर व मन हीं पूर्वी अगदीं भिन्न मानीत असत; परंतु त्यांचा अत्यंत निकट संबंध आहे असे आतां ठरले आहे. योग्य मर्यादेपर्यंत दोघांस श्रम झाल्यास एकमेकांच्या श्रमांचा एकमेकांस फायदा होतो; परंतु एकाचे किंवा दोघांचे श्रम वाजवीपेक्षा जास्त झाले, तर त्यापासून दोघांसही परिणाम अपाय होतो. या दोघांचा निकट संबंध आहे यास एक प्रमाण असे आहे की, अतिरिक्त शारीरिक श्रम व मानसिक श्रम यांनीं मूत्राच्या रूपामध्ये जो फरक पडतो त्याचे स्वरूप साधारणपणे सारखेच असते.अतिरिक्त शारीरिकश्रमापासून आरोग्यावर होणारे जे परिणाम पुढे दिले आहेत, त्यांवरूनही अतिरिक्त शारीरिक श्रम व मानसिक श्रम यांचे परिणाम कांहीं अंशीं सारखेच असतात असे दिसून येईल. याकारतां व्यायाम करणारांनी आपली एकंदर ताकद पाहून त्या मानाने मानसिक श्रम करावे. व्यायामाने एकंदर ताकद जसजशी वाढत जाईल तसतसे मानासिक श्रम वाढविले तर कांहीं हरकत नाही. परंतु ही गोष्ट कालांतराने होणारी आहे हे विसरता कामा नये. | विशेष मानसिक श्रम किंवा अभ्यास करणाच्या मुलांनी तालीम अथवा कोणतेही शारीरिक श्रम अगदी बेताने करावे.