पान:व्यायामशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७१ ] झाल्यामुळे ते लवकरच विकृत होते. अतिरिक्त मेहनत केल्याने रक्ताशय दार्श्वयुक्त होऊन, शेवटीं रक्ताशयाचे विकाराने ज्यांना मृत्यु आला आहे अशांची उदाहरणे अनेक आहेत. | शारीरिक शक्तीचे पराक्रम पुष्कळ दिवस टिकणे रक्ताशय द फुफ्फुसे यांच्या मजबुतीवर अवलंबून आहे.-एकादं काम करण्यास जी ताकद किंवा उत्साह लागता तो रक्तापासून उत्पन्न होतो. रक्ताचा प्रवाह जोराने चालण्यास , मजबूत रक्ताशयाची आवश्यकता आहे, व शरीरभर फिरून आलेल्या रक्ताची शुद्धि होण्यास मोठ्या फुफ्फुसांची आवश्यकता आहे; म्हणून अंगावर पडलेली कामें उत्साहाने पार पडण्यास जोरदार रक्ताशय व फुफ्फुसे यांची जरूरी आहे. याकरितां हीं इंद्रियें विशेष मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर इंद्रिये मजबूत असूनही या इंद्रियांचे दुर्बलतेमुळे उद्योग मध्येच टाकून देण्याचे प्रसंग लोकांस येतात. ज्यांचे रक्ताशय विकृत झालेले होते असे पैलवान कुस्तीस निरुपयोगी झाल्याची व अल्पवयीं मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. ज्या ज्या चढाओढीत शारीरिक बलाची अपेक्षा असते, त्या त्या चढाओढीत, ज्या लोकांची रक्ताशय व फुफ्फुसे हीं इंद्रियें मजबूत असतात, असेच लोक टिकाव धरतात, असा सामान्य नियम आहे. आरोग्याच्या दृष्टीने, सहनशक्ति अथवा चपळता किंवा वेग वाढविणारे व्यायाम, अवघड ( ज्यांस शक्तीची विशेष अपेक्षा असते अथवा ज्यांनी स्नायूस विशेष ताण बसतो