पान:व्यायामशास्त्र.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६७ ] व्यायामासंबंधानें किरकोळ सूचना. जेवणानंतर सुमारे दोन तासपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करूं नये. भुकेने अतिशय व्याकूळ झाले असतांही व्यायाम करू नये. २. व्यायाम करीत असतां अथवा एरवीही तोंडाने श्वासोच्छास कधीही करू नये. व्यायामानंतर थंड पाणी पिऊ नये. तालीम करणाराने तिखट बेताचे खावे. दूध, तुप यांचा, उपयोग थोडा जास्त करावा. व्यायामास प्रथमच आरंभ करणा-या अशक्त लोकांस सूचना. • व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यावर एकादा तीव्र विकार उत्पन्न झाल्यास व्यायाम कांही दिवस बंद ठेवावा व विकार थांबल्यावर व्यायाम बेताने सुरू करावा. .. व्यायामास प्रथम प्रारंभ केल्यावर मानसिक श्रम ( अभ्यास, वाचन वगैरे ) कमी करावे. - व्यायाम केल्यावर लवकर हुषारी न येईल तर व्यायामानंतर अंग रगडून घेऊन नंतर स्नान करावे. . व्यायामानंतर अर्ध्या किंवा एका तासानंतर पावशेर दूध प्यावे. दूध धारोष्ण असावे किंवा तापवून निवालेले असावे. कढत दूध पि चांगले नाही. कढत पे प्याल्याने कोट्यास कायमची दुर्बलता येते.