पान:व्यायामशास्त्र.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ [ ६६ ] नाचे व्यायामावर काम भागविणे हा अनिर्वाहपक्ष आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आंगाचे मर्दन करतांना तेल लावण्याची जी पद्धत आहे, ती चांगली आहे. मात्र या तेलाचा ओषटपणा पुरता निघून जाईल. अशी व्यवस्था केली पाहिजे. आंग तेलकट ठेवणे हितावह नसते, कारंण आंग तेलकट ठेवल्याने घामाची भोके बंद होऊन घाम जाण्यास प्रतिबंध होतो. शिवाय तेलकटपणामुळे अंगावर धुराळाही जास्त चिकटून बसतो. हजामतीनंतर तेल लावून कांहीं वेळ बसल्याने मनास अस्वस्थता कशी वाटते याचा आपणांस अनुभव आहेच. तालीम करण्यास प्रथम आरंभ करणा-यांस सूचना. | आपल्या शक्तीबाहेर तालीम केल्याने प्रकृतीस कायमचा अपाय होतो. म्हणून आपली ताकद पाहून व्यायामाचे प्रमाण ठरवावे. व्यायाम वाढविणे तो क्रमाक्रमाने वाढवावा. वाजवीपेक्षा कमी व्यायाम केल्याने म्हणण्यासारखा तोटा होत नाही, पण वाजवीपेक्षा जास्त व्यायाम केल्याने शरिरास कायमची इजा होते हैं। लक्षात ठेवावे. तालीम करण्यास प्रथम प्रारंभ केल्यावर दुस-या दिवशीं आंग दुखते; पण त्याविषयी विलकूल काळजी करू नये. आंग थोडे चोळून घेतले म्हणजे हे दुखणे कमी होते व तशाच स्थितीत मेहनत करण्याचे चालू ठेवल्याने हे आंग दुखणे आपोआप थांबते.