पान:व्यायामशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७ वा. व्यायामासंबंधाचीं कांहीं सामान्य तत्वे एका अवयवास व्यायाम घडला असता इतर अवयवां सही अंशतः व्यायाम घडतो.-शरिरातील सर्व इंद्रियें व अवयव यांचा परस्परांशी संबंध आहे. यामुळे, ज्याप्रमाणे झाडाची एक फांदी हलावला कीं इतर फांद्या कमी जास्त मानानें हालतातच, त्याप्रमाणे शरिराच्या कोणत्याही एका भागास व्यायाम मिळाला म्हणजे इतर भागांसही अंशतः व्यायाम मिळतो. उदाहरणार्थ, आपण एका हाताने जोडी करीत असलो तर तो हात हालतांना शरिराचे इतर भाग हालतातच. हीच गोष्ट इतर सर्व व्यायामांस लागू आहे. • शरिराच्या कोणत्याही भागास व्यायाम झाला म्हणजे फुफ्फुसांसही व्यायाम घडतो.-ह्याचे कारण पुढील प्रमाणे आहे. शरिराच्या ज्या भागास व्यायाम घडतो, तेथील कांहीं द्रव्य मल होऊन तेथे कार्बनिक आसिड ग्यास उत्पन्न होत असतो. या ग्यासामुळे रक्त अशुद्ध होते. ते शुद्ध करण्याचे काम फुफ्फुसांचे असल्यामुळे, व्यायामाने शरिराच्या कोणत्याही भागांत कार्यानिक आसिड वायु उत्पन्न झाला, की फुफ्फुसांचे काम वाढते. अर्थात् या योगाने फुफ्फुसाचे काम जोराने चालून त्यांना व्यायाम घडतो..