पान:व्यायामशास्त्र.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२३ ] प्रकारच्या तुकड्यावर एक फळी आडवी ठेवून ती समतोल केली होती. ही फळी समतोल राहील अशा रीतीने तिजवर एका मनुव्यास आडवे निजविले होते. नंतर या मनुष्यास एक तोंडचा हिशेब किंवा सोपे उदाहरण करण्यास सांगितले; तेव्हां त्याच्या डोक्याकडील : फळीची बाजू खाली जाऊ लागली. नंतर त्यास मनाची एकाग्रता पायावर करावयास सांगितले; त्या वेळी त्याच्या पायाकडील बाजू खाली जाऊ लागली. | या प्रयोगावरून हे उघड दिसते की, शरिराच्या ज्या भागावर मनाची एकाग्रती होते, त्या भागामध्ये रक्ताचा प्रवाह जोराने जातो. | इंद्रियावर मनाची एकाग्रता झाल्याने त्यास रक्ताचा पुरवठा होत असल्याने, शरिराचे हितासाठीं जो व्यायाम करावयाचा त्यामध्ये आपले मन पाहिजे. म्हणून व्यायाम करतांना तो उत्साहानें व शरिराच्या त्या त्या भागावर मनाची एकाग्रता करून केला पाहिजे. व्यायाम करतांना मनामध्ये दुसरे विचार न आणतां जो व्यायाम चालू असेल त्याशी तादात्म्ये पावावे. उदाहरणार्थ, जोर काढीत असतां दुस-या तिस-या गोष्टींचा विचार न करतां दंडावर मनाची एकाग्रता करावी; व माझ्या दंडाकडे रक्ताचा प्रवाह चालला आहे व ते फुगत आहेत अशी मनाची भावना करावी, असेच इतर सर्व व्यायामासंबंधाने करावे. | इच्छेविरुद्ध व्यायाम केला तर त्यापासून व्हावा तितका फायदा होत नाही. याकरितां मुलांकडून केवळ सक्तीने व्यायाम करून