पान:व्यायामशास्त्र.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[.५२] याचे कारण, पैलवानाचें मन जसे मेहनतींत असते, तसे घिसाड्याचे नसते, हे होय. पैलवान शोकाकारतां मेहनत करतो व घिसाडी पोटासाठी मेहनत करतो. यामुळे हा फरक पडतो. इतर शक्तींची वाढ होण्यासही ही गोष्ट लागू आहे. गवयाचा शिष्य गवयाचे गाणे ऐकतो त्याप्रमाणे तबलजीही ऐकतो; परंतु त्या ऐकण्याचा फायद गायन शिकू इच्छिणाच्या शिष्यास जसा होतो, तसा तबलजीस होत नाही. याचे कारणही एकाचे त्या गोष्टीकडे लक्ष असते व दुस-याचे नसते हे होय. आपण जो उद्योग करतो त्याकडे लक्ष असल्यानेच शक्तीचा विकास विशेष होतो याचे कारण पुढील प्रमाणे आहे. कोणत्याही इंद्रियाचा विकास होण्यास त्या इंद्रियास रक्ताचा भरपूर पुरवठा झाला पाहिजे व रक्ताचा भरपूर पुरवठा होण्यास त्या इंद्रियावर मनाची एकाग्रता झाली पाहिजे. जी क्रिया आपण करतो तिजमध्ये आपले मन असले म्हणजे ती क्रिया ज्या अवयवांनी करावयाची असते त्यांच्यावर मनाची एकाग्रता झाल्याने त्याचेकडे रक्ताचा प्रवाह जोराने जातो. सर्व शरिरांत रक्ताचा प्रवाह एकसारखा फिरत असतोच; पण एकाद्या भागांत रक्ताचा प्रवाह विशेष जाणे हे त्या भागावर मनाची एकाग्रता होण्यावर अवलंबून आहे असे दिसून येते. ही गोष्ट प्रयोगाने सिद्ध झाली आहे. याविषयी पुढीलप्रमाणे प्रयोग केला होता. ताजव्याची दांडी ज्या प्रकारच्या तिकोनी ( कु-हाडीसारख्या किंवा पाचरीसारख्या ) तुकड्याचे धारेवर उभी केली असते, तशा