पान:व्यायामशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५४ ] घेऊ नये. व्यायामाचे महत्त्व त्यांना सांगून अथवा व्यायामाने होणारी सुधारणा त्यांना दाखून व्यायाम करण्यास त्यांना उद्युक्त करावे. खेळांतील व्यायाम मुले स्वतःच्या खुषीने करतात. यामुळे त्यापासून त्यांना फायदा होतो. म्हणून ज्यांपासून व्यायाम होतो असे खेळ मुलांस अवश्य खेळू द्यावे. व्यायामापासून फायदा होण्यास त्यामध्ये आपले मन पाहिजे हैं कधीही विसरता कामा नये. चलन सावकाश व अनेकवेळां व्हावे-शक्ति - वाढावण्याकरितां म्हणून जो व्यायाम करावयाचा तो सावकाश व अनेक वेळां केला पाहिजे. व्यायामापासून होणा-या विकासाचे परिमाण( स्नायूनें उचलले जाणान्या )वजनाचे प्रमाणावर विशेष अवलंबून नसून हालचालीच्या संख्येवर मुख्यतः अवलंबून आहे. उदाहरणार्थ, दंड मोठे करणे असतील तर ती गोष्ट १० शेरांचे वजन दिवसांतून दहापांच वेळां उचलण्यापेक्षां १ शेराचे वजन १०० वेळां उचलण्याने जास्त लवकर साध्य होते. स्नायूंची वाढ होण्यास त्यांमध्ये रक्ताचा प्रवाह जास्त प्रमाणानें व पुष्कळ वेळां गेला पाहिजे. स्नायु सावकाश हालविल्याने त्यांत रक्ताचा प्रवाह स्नायूच्या निरनिराळ्या भागांचे पोषण करीत सावकाश जातो, व स्नायु अनेक वेळां हालविल्याने त्यांचे पोषण अनेक वेळां होते; म्हणून स्नायूंचे चलन सावकाश व अनेक वेळां झाल्याने त्यांचा विकास चांगला होतो. ज्याप्रमाणे अन्न एकदम भराभरा खाण्यापेक्षां सावकाश व २।३ वेळी खाल्याने शाररास