पान:व्यायामशास्त्र.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[५१ ] नियमित आहे व सामर्थ्याचा फाजील विनियोग शरीरवृद्धीकडे झाला म्हणजे मन व बुद्धि यांच्या विकासास कमीपणा येतो. फाजील शारीरिक श्रम केल्याने बुद्धिमांद्य येते ही गोष्ट प्रसिद्ध आहे. ग्रीक लोकांमध्ये पैलवान म्हणजे निर्बुद्ध मनुष्य असा समज झाला होता. अतिरिक्त मानसिक श्रमानेही शरीर दुर्बल होते ही गोष्टही अनुभवसिद्ध आहे. अशा प्रकारची स्थिति असल्यामुळे व हल्लांच्या काळीं शारीरिक शक्तीपेक्षां बुद्धिसामर्थ्याची विशेष जरूरी असल्यामुळे बुद्धिमांद्य येईल किंवा चापल्य नष्ट होईल इतकी मेहनत करू नये. विशेषतः ज्यांना पुढे बुद्धिसामर्थ्याचा धंदा करावयाचा आहे त्यांनी अतिरिक्त मेहनत करू नये. अभ्यास करणा-या मुलांनी अतिरिक्त व्यायाम केल्यामुळे त्यांना बुद्धिमांद्य आल्याची उदाहरणे आहेत; एवढेच नव्हे, तर अतिरिक्त व्यायाम व अतिरिक्त अभ्यास हीं दोन्ही एकाच वेळी केल्यामुळे प्रकृतीचे कायमचे नुकसान झाल्याची उदाहरणेही पाहण्यांत आहेत. म्हणून बुद्धिसामर्थ्याचा धंदा ज्यांना करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी व्यायाम करण्यामध्ये शक्तिसंपादन हा हेतु मुख्य न धरतां इंद्रियांची मजबुती, आरोग्य, चापल्य, उत्साह, इत्यादिकांचे संपादन करणे हा हेतु मुख्य धरावा. | एकाग्रता कोणताही उद्योग करतांना त्यामध्ये आपले मन नसेल, तर त्या उद्योगापासून आपल्या शक्तीस फायदा होत नाहीं. याकरितां शक्तीचा विकास व्हावा या हेतूनें जो उद्योग करावयाचा त्यामध्ये आपले मन पाहिजे. लोहार किंवा घिसाडी रोज पुष्कळ काम करतो, परंतु त्याचे शरीर पैलवानाइतके तयार होत नाहीं.