पान:व्यायामशास्त्र.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५० ] लोक टिकाव धरणाच्या लोकांपेक्षा जास्त मोठी ओझीं उचलणारे असतात असे मुळीच नसते. उलट आपणांस असे देखील म्हणतां येईल की, शिवाजी अथवा बाजीराव यांच्या सारख्या आवेशी व प्रसंगावधानी मनुष्याच्या हातात काठी देऊन त्यांच्या आंगावर त्यांच्यापेक्षा जास्त शक्तीचे हातात काठी घेतलेले २४ इसम सोडले, तर ते इसम मार खाऊनच परत येतील. याप्रमाणे मारामारीतही केवळ शक्ति फारशी महत्त्वाची नाहीं. म्हणून त्या दृष्टीनेही तिचे महत्त्व विशेष नाहीं. एरव्हीं व्यवहारांत पाहिले तर तेथेही केवळ शक्तीचा विशेष उपयोग नाहीं. शारीरिक गुणांपैकी कोणते गुण व्यवहारांत विशेष लागतात हे पाहिले, तर ते उत्साह ( काम जोराने व पुष्कळ वेळपर्यंत करण्याची ताकद ), चापल्य (काम भराभरा करण्याची शक्ति ), कंटकपणा, ( ऊन्ह, पाऊस, थंडी, भूक, तहान वगैरे सहन करण्याची शक्ति ) अष्टपैलूपणा वगैरे गुण दिसून येतात. म्हणून शारीरिक संपात्त कमावणे म्हणजे वरील गुण संपादन करणे होय हे ध्यानात ठेवले पाहिजे व हा हेतु ध्यानात धरून व्यायाम केला पाहिजे. | सामान्य लोकांनी अलौकिक शक्ति संपादण्याची हांव धरूं नये- सामान्य लोकांना केवळ शक्तीपेक्षां निरोगी प्रकृति चापल्य, प्रसंगावधान, अष्टपैलूपणा, तडफ या गुणांची आवश्यकता विशेष आहे म्हणून त्यांनी मोठ्या जोड्या पेलण्याची किंवा फार जड डंबेल्स वापरण्याची हांव धरूं नये. मन, बुद्धि व शरीर यांचा विकास करण्याचे शरीरांतील एकंदर सामय कांहीं अंशीं