पान:व्यायामशास्त्र.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४९ ] आवेश, तडफ इत्यादि गुणांच्या स्वरूपाचे आहे. वाघ इतर श्वापदांवर आपले वर्चस्व कां स्थापितो, किंवा जगामध्ये एक मनुष्य इतरांस आपल्या सामर्थ्याने भारी को होतो, याचे कारण शोधू गेले असतां तें आवेश, कौशल्य, तडफ इत्यादि गुणांमध्येच आढळून येईल. केवळ मोठे ओझे उचलण्याच्या शक्तीमुळे मनुष्य पराक्रमी होऊ शकत नाही. सैन्यरचना, डावपेंच व यांत्रिक शस्त्रास्त्र या बुद्धिसामर्थ्याच्या योजनांचें ज्या वेळी विशेष महत्त्व नव्हते, अशा वेळचे पराक्रमी पुरुष पाहिले, तर त्यांमध्ये भीमासारखे केवळ शक्तिमान् पुरुष फार थोडे आढळून येतात. अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, अश्वत्थामा हे पौराणिक वीर किंवा शिवाजी, बाजीराव, मल्हारराव, राघोबादादा हे ऐतिहासिक वीर पुरुष ओझे उचलण्यांत किंवा साखळदंड तोडण्यांत प्रसिद्ध होते, असे मुळीच दिसून येत नाहीत. उलट बाजूने पाहिले, तर पेशव्यांच्या वेळचे किंवा अलीकडचे पहारा वांकविणारे पैलवान युद्धांत विशेष उपयोगी पडत होते असेही दिसून येत नाहीं. असे असण्याचे कारण काय हे पाहू गेले असता असे दिसून येईल की, जगांतील संग्रामांत जे गुण विशेष उपयोगी पडतात, ते ओझे उचलण्याच्या शक्तीच्या जातीचे नसून ते आवेश, प्रसंगावधान, संधानकौशल्य अशा प्रकारचे असतात. ही युद्धाची गोष्ट झाली. लहानसान संग्रामांतही कोणते शारीरिक गुण विशेष उपयोग पडतात हे पाहिले तरी ते वरील गुणच आढळून येतील. दोन पक्षांत मारामारी झाली असतां मार खाणारे किंवा पळून येणारे