पान:व्यायामशास्त्र.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६ वा. > व्यायाम करणारांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी. सामान्य लोकांनी व विशेषतः विद्याथ्र्यांनी व्यायाम करण्यांत मुख्य हेतु कोणता धरावा ?--शारीरिक संपत्ति कमाविणे म्हणजे अतिशय मोठी ओझी उचलण्याची शक्ति किंवा दोरीवर अथवा आडव्या काठीवर उभे राहून अनेक प्रकारच्या कसरती करण्याची शक्ति संपादन करणे होय, अशी जी कित्येकांची समजूत आहे ती चुकीची आहे. वरील गोष्टी शारीरिक संपत्तीचे एक अंग मानतां येईल, परंतु तीच सर्व शारीरिक संपत्ति नव्हे, हे विसरता कामा नये. याचे कारण शारीरिक संपत्तीचा उपयोग काय व तिला महत्त्व कोणत्या कारणाने प्राप्त झाले आहे याचा विचार केल्याने कळून येण्यासारखे आहे. मनुष्याची या आयुष्यातील इतिकर्तव्यता, सत्कृत्ये करणे ही आहे; व हा हेतु साध्य करण्यास लागणारी साधने म्हणजे ज्ञान, इच्छासामर्थ्य व शारीरिक सामथ्र्य हीं होत. पैकी पहिली दोन साधने बृद्धि व मन यांच्या शिक्षणाने प्राप्त होणारी आहेत व तिसरें साधन शारीरिक शिक्षणाचे द्वारे प्राप्त होणारे आहे. जगामध्ये आपला जय होण्यास ज्या शारीरिक सामर्थ्याची जरूरी आहे ते सामर्थ्य हत्तीच्या बलाच्या रूपाचे नसून, ते चापल्य, कौशल्य,