पान:व्यवहारपद्धति.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ व्यवहारपद्धति.. [ प्रकरण पराव गुजर हे मोठ्या नावलौकिकाचे सरदार होते. त्यांस मोंगलांकडील सरदार दिलेलखान व एरवलासखान यांस मारून धुळीस मिळविण्याविषयी महाराजांची आज्ञा झाली होती. त्याप्रमाणे सालेरी किल्लयाजवळ दिलेलखान व एखलासखान असतां, कोकणांतून पेशवे, व घाटावरून प्रतापराव, यांनी चालून येऊन घोरतर युद्ध केले. ही लढाई भारती युद्धाप्रमाणे मोठ्या निकराची झाली. तांत पेशवे व प्रतापराव यांच्या लोकोत्तर पराक्रमामुळे महाराजांस जय प्राप्त झाला, व मोंगलांचे सरदार पराभव पावले. त्यासमयीं महाराजांनी पेशवे व गुजर यांस गौरव करून पत्र लिहिलें तें विचार करण्यासारखे आहे. यास्तव त्या पत्राचा येथे संक्षिप्त उतारा देतो.

  • राजश्री मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत यांस आज्ञा केली ऐशीजेः- तुह्मी विनंतीपत्र हुजूर पाठविले, तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण झाला. तुह्मी महत्कार्यकर्ते धुरीण, केवळ महाराजांचे पंचप्राण, दुसरा अर्थ तुमचे ठायीं अणुमात्र नाहीं. तुझी यासमयीं जिवाची आस न धरितां एखलासखान नबाब व दिलेलखान हप्तहजारी हे पादशाही उमराव, कांहीं सामान्य नव्हत, केवळ पादशहाचे भात्यांतील तीक्ष्ण तीर, असे असता, त्या यवनांचा तुह्मी पराभव करून सेवकपणाची कीर्विं